
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। काल झालेल्या अवकाळी पावसामळे प्रचंड नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जनावरेही दगावले आहेत.

पहाटे दि.१७ मार्च २०२३ रोजी अचानक वादळीवाऱ्यासह पाऊस व विजेच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस जोरात पडला. यामध्ये नायगाव तालुक्यातील मौजे रानसुगाव येथील शेतकरी व्यंकटी रामराव जाधव यांच्या शेतातील जागलीवर असलेल्या बैलावर विज पडून बैल जागीच ठार झाला यामुळे सदर शेतकरी हावलदील झाला असून प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावे अशी मागणी होत आहे.

