
नांदेड| मुदखेड तालुक्यातील कामळज येथील शेतकरी श्रीदत्त राम शामजी पाटील यांच्या बैलाच्या अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात गारपीठ, वारेवादळ व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. मुदखेड तालुक्यातील माळकोठा सर्कलमधील कामळज परिसरात गारपीठीने पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरूवार दि.16 मार्च 2023 रोजी सायंकाळी 8 वाजता अचानक वादळवाऱ्यासह पाऊस सुरू झाला.

यावेळी श्रीदत्त राम श्यामजी पाटील यांच्या शेतात असलेल्या बैलावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. याची माहिती मिळताच डॉ.कांबळे साहेब, ढगे साहेब, तलाठी मुदगुलवाड साहेब, सरपंच, पोलीस पाटील यांनी भेट देवून पाहणी व पंचनामा केल आहे. बैलाचा वीज पडून मृत्यू झाल्याने शेतकरी श्रीदत्त श्यामजी पाटील यांचे मोठे नुकसान झाले आहे.

