
नांदेड। धर्माबाद तालुक्यातील बेलगुजरी नळ पाणीपुरवठा योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप करीत बालाजी साळवे यांनी जिल्हा परिषद प्रशासकीय कार्यालयासमोर अमळनेर उपोषण दिनांक 15 मार्चपासून सुरू केले होते या उपोषणाची दखल घेत कार्यकारी अभियंता अमोल पाटील यांनी संबंधित उपविभागीय अभियंता यांना चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिल्याचे पत्र आंदोलकास कळविण्यात आल्याने बालाजी सावळे यांनी उपोषण स्थगित केले.

बेलगुजरी पाणीपुरवठा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा आरोप करीत स्थानिक निवासी असलेले बालाजी सावळे यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा अमोल पाटील यांनी संबंधितांना चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत उपोषणार्थी बालाजी सावळे यांना लेखी उत्तर देऊन उपोषण माघार घेण्यास आवाहन केले या आवाहनाला प्रतिसाद देत उपोषणार्थीला डाटा एन्ट्री ऑपरेटर ए.वाय.भांगे, के बी देशमाने सरपंच प्रतिनिधी बाबुराव निदानकर, लक्ष्मण पांचाळ , उत्तम वडगावकर , मारुती स्वामी , दिलीप भंडारे यांच्या उपस्थितीमध्ये ज्यूस प्राशन करून उपोषणाची सांगता केली.

