
हदगाव, गजानन जिदेवार। चिंचोली (संगम) गावालगत पेनगंगा व कयाधू नदीचा संगम झाल्यामुळेच चिंचोकी संगम असे नाव त्या गावाला दिले आहे.तिथे संगमेश्वर नावाने पुरातन काळातील संगमेश्वर महादेव मंदीर हे जागृत देवस्थान आहे .शंभर ते दीडशे किलोमिटर दुरवरचे भाविक भक्त मंडली सुद्धा या ठिकाणाला दर्शनासाठी येतात. पुर्विचे मंदीर थोडे जिर्न झाल्यामुळे इ. स २०११ साली या मंदिराचा जिर्णोद्धार केला. पहिले जुने मंदीर काढून त्या ठिकाणी नवीन मंदीर उभारले आहे या ठिकाणी एका सेवेकरी महाराजांनी जिवंतपणे समाधी घेतली आहे त्या संजीवन समाधीचे अंदाजे तीनशेहून अधीक वर्षांखालील हेमाडपंथी बांधकाम आजही जसेच्या तसे साबीत आहे .त्याच बरोबर जवळपास एका मंदिरात राहणारा पाळीव कुत्रा व पंचविस महाराजांच्या समाध्याही त्याठिकाणी आहेत. आजही त्या शेकडो वर्षांपूर्वीच्या समाध्या मंदिर परिसरात दिसतात.

पुर्वी या ठिकाणी मोठी यात्रा भरत होती, परंतु १०५ वर्षापुर्वी मोठा महापुर आला होता आणि त्या महापुरामुळे नदीने आपले पात्र बदलले दोन नदयांचा संगम ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणापासून नदीच्या जवळपास दिड किलोमीटरवर चिंचोली संगम गाव वसलेले आहे. आणि गावापासून एक किमी पेक्षा कमी अंतरावर दोन नंदयांचा परत संगम झाला आहे.महापुर आल्यामुळे तेथे राहणारी महाराज मंडळी अतिशय भयभित झाली आणि त्यांनी तेथील आपले वास्तव्य सोडले .त्यामुळे तेथील यात्रेचे स्वरूप फारच कमी झाले.

नंतर १९६२-६३ च्या महापुरामध्ये मातामाय स्त्री महाराज हया मंदिराची देखभाल करण्यासाठी आल्या .परत महाभयंकर पुर आला मंदीरामध्ये पाणीच पाणी झाले तेव्हा त्या मातामाय लाकडावर बसुन दोन दिवस मंदिरातच होत्या मंदीराचा दरवाजा बुजण्यास एकच फुट शिल्लक राहीला होता ही घडलेली गोष्ट परीसरातील सर्वाना माहीत आहे. शासन दरबारी चिंचोली संगम गावाची नोंद अतीसंवेदनशिल गाव म्हणुन आहे.विदर्भ व मराठवाडा हद्द ही पैनगंगेवरून ठरलेली आहे. नदीच्या एका बाजूला विदर्भ आणि दुसऱ्या बाजुला मराठवाडा असे हदगाव,हिमायतनगर, उमरखेड,माहुर,सारखे अनेक तालुक्यांतुन हि नदी वाहते आहे.पैनगंगा नदीने पात्र बलल्यामुळे गावाच्या हद्दीमधील २७० एकर जमीन ही मराठवाडा भागाकडून गेलेली आहे. आणि त्या जमिनिची नोंद यवतमाळ जिल्ह्यातच आहे.

आजही पैनगंगा नदी पुन्हा पात्र बदलण्याच्या मार्गावर आहे इ.स. २००६ साली आलेल्या महापुरामध्ये गावाच्या चारही बाजूने नदीचे वाहते पानी गावामध्ये शिरले होते. मोठा महापुर आला होता परंतु सुदैवाने कयाधु नदीचे पुराचे पाणी कमी झाल्यावर पैनगंगेवरील इसापुर धरणाचे संपुर्ण गेट पुर्ण क्षमतेने सोडले होते कयाधु नदीचे पाणी आणि इसापुर धरणाचे पाणी एकाच वेळी आले असते तर गावाची खुप मोठी हानी झाली असती इश्वराच्या कृपेने तसे झाले नाही परंतु भविष्यामध्ये गावाची मोठी हानी होऊ शकते. ही बाब लिहुन ठेचण्यासारखी आहे.

गावाची हानी होऊ दयायची नसेल तर सरकारने विशेष लक्ष्य घालायला पाहीजे ते आत्यंत गरजेचे आहे. नदीचे खोलीकरन करुन पुरप्रतीबंधक बांध गावाच्या सरक्षणाकरीता बांधला पहिजे. गावाच्या हट्टीतील जमीन नदीच्या पलिकडे गेल्यामुळे व मंदीरही. मरीच्या पलीकडे गेल्यामुळे दळणवळणासाठी नदीवर पुल अती आवश्यक आहे- सध्या गावामध्ये तिन मंदीराचे बांधकाम पूर्ण झाले आहे.श्री संगमेश्वर महादेव मंदीर, श्री बसवेश्वर महादेव मंदीर व श्री गुप्तलिंगेश्वर महादेव मंदीर या तिनही मंदीराचा कलशारोहन कार्यक्रम दि. २४/०२/२०२३ रोजी थाटात संपन्न झाला शंकर चिंचोलकर,दादाराव सुर्य, गणेश चिंचोलकर, सतीश हदरगे, नंदेश्वर जवळे, विलास नावडे,कैलास नावडे, गणेश नावडे सह हदगाव येथील कोंडेकर, पोलीस कर्मचारी सुदर्शन चिंचोलकर,सुशीलाताई गुडुप, यांच्या सह अनेक भाविक भक्त उपस्थित होते.

संगमेश्वर मंदिराची पाच एकर जमीन फुटाणा परिसरात आहे तेथील मंदिराचे पुजारी भारती महाराज यांनी खंडपत्राने लावली होती मात्र त्या जमीनीचा ताबा सदर व्यक्तीं सोडत नसल्यामुळें अखेर एका भक्ताने त्या व्यक्तीच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली असून सदर प्रकरण जलदगतीने निकाली काढण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. पेनगंगा नदीवरच ईसापुर धरण झाले धरणातून येणार पाणी तीवरंग ,झाडगाव ,शेंबाळपिपरी, हातला, पळशी, मनूला, साप्ती, बेलखेड ,पेवा, करोडी ,काळेश्वर, वरून संगम चिंचोली येथे येऊन पेनगंगा व कयाधूचे संगम झाले.

कयाधू नदी ही हिंगोली डोंगरगाव, बाळापुर ,शेवाळा , व हदगांव तालुक्यातील उंचाडा, करमोडी, तालंग, पिंपरखेड , मार्लेगाव, रुई ,धानोरा, आडा ,भानेगाव, उंचेगाव, बेलगवान वरून संगम चिंचोली येथे येऊन पेनगंगेला मिसळून दोन्ही नद्यांचा संगम झाला. रस्त्याने फुटाणा व शिवदरा येथील मोठा नाल्याचे पाणी नदीला येऊन मिसळल्याने ही नदी पुढे प्रत्येक गावातील नाल्यामुळे मोठी मोठी होत गेली. हदगाव तालुक्यातील चिकाळा ,डिग्रस ,तामसा, कंजारा, वाळकी ,कामारी मार्ग येणारी तिसरी नदी ह्याच पात्रामध्ये वाटेगाव हरडफ,धोतरा,कामारी जात असताना तिसरा संगम झाला आहे
