
अर्धापूर, निळकंठ मदने| तालुक्यातील पाटणूर परीसरात गुरुवारी चारच्या सुमारास तब्बल अर्धातास सारखी गारपीट पडली, त्यामुळे केळी,ऊस,हरभरा,गहु या पीकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाली असून,ही पीके जमीनदोस्त झाली आहेत,तर शिजवलेली हाळदही खराब झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

हवामान विभागाने पाऊस,वारे व गारपीटीचा चार दिवसात इशारा दिला होता, त्यामुळे हरभरा,गहु काढणीला शेतकरी गरबड करीत होते,पण मजुर व मळणी यंत्र मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा नाईलाज झाला तर हाळद झाकण्यासाठी पुरेशा फाऱ्या न मिळाल्याने हाळद भिजली आहे.गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास अर्धापूर तालुक्यातील पाटणूर येथे तब्बल अर्धातास सारखी काचेच्या गोळीएवढी गारपीट झाली. त्यामुळे सर्वत्र हिरवागार असलेला परीसरात केळी,ऊस,हरभरा,गहू, ज्वारी व हाळद ही पीके जमीनदोस्त झाली.

केळींचे बागांची अत्यंत दुर्दर्शा झाली,खैरगाव येथे तुरळक गारा पडल्या,लगत असलेल्या बारड व निवघा ता.मुदखेड परीसरात मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. या गारपीटीमुळे रब्बी पीकांसह प्रमुख असलेले केळी,ऊसया पीकांचे पुर्णपणे नुकसान झाले. पाटणूर येथील शेतकरी सुभाषराव देशमुख यांनी पुर्णपणे निराधार झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी त्वरित पंचनामे करण्याची मागणी सबंधीताकडे केली आहे.या घटनेमुळे शेतकरी वर्गात शोककळा पसरली आहे.

