
नायगांव, रामप्रसाद चन्नावार। दि.१६.३.२०२३ रोज गुरुवारी किसान स्वराज फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. नरसी येथे नाफेड व महा. एफ. पी.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १६.३.२०२३ गुरुवारी खरेदी केंद्राचे उद्घाटन येथील विक्री करण्यास आलेल्या शेतकऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे.

अध्यक्ष स्थानी मा. जिल्हा परिषद सदस्य (नांदेड),भारतीय जनता पार्टी ओबीसी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा भारतीय खाद्य निगम सल्लागार समिती सदस्य महाराष्ट्र राज्य श्री. माणिकराव लोहगाव होते. राय घुगे सा. बा. अभियंता, गोणेवार, सा बा उपअभियंता, पवळे मंडळ अधिकारी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुर्याजी पा.चाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रथम सदबा कांडले या शेतकऱ्यांच्या हरभऱ्यांचे पूजन ,मशिनरी पूजन करून खरेदी केंद्र शुभारंभ करण्यात आला ,किसान स्वराज फार्मर प्रोडूसर कंपनी लि. नरसी येथे एकूण तेराशे शेतकरी असलेल्या या कंपनीचे अकराशे शेतकरी सभासद हे ऑनलाईन झालेले आहेत. व बाकी शेतकऱ्यांची ऑनलाईन चालु आहे.

गेल्या वर्षी कंपनीकडून अनेक कोटींचा शेतमाल खरेदी करण्यात आला होता, शेतमाल शासकीय खरेदी केंद्राला दिल्याने योग्य हमीभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा ओढा अधिकच असतो ,शेतकऱ्यांचा माल शेवटपर्यंत खरेदी करण्यात येणार असून हंगाम २०२२- २३ चा हरभरा ऑनलाइन नोंदणी ३१ मार्च पर्यंत सुरू आहे .तरी यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र आधार कार्ड ,बँक पासबुक, हरभरा नोंद असलेला सातबारा व आपला चालू असलेला मोबाईल नंबर असे कागदपत्र घेऊन नरसी ऑफिस येथे भेट द्यावे, असे आव्हान चेअरमन माणिकराव लोहोगावे साहेब यांनी केले .यावेळी शंकर भेरे सर ,विश्वनाथ बडुरे सर ,नारायण कोसंबे सर, परमेश्वर पा जाधव कांडाळकर, गोपाळ नाईके, मारुती पा भिलोंडे, रमेश पा पवळे ,बालाजी भास्करे, माधव बावलगावे, माधव कळकेकर ईत्यादी उपस्थिती होते.

