
नवीन नांदेड। १६ मार्च रोजी सायंकाळी अचानक झालेल्या अवकाळी व गारपिट पावसामुळे गावातील जवळपास ९० हेक्टर जमिनीवरील गहू, हरभरा, ज्वारी यासह भाजीपाला याचे नुकसान झाले तर गावातील जवळपास तिस घरावरील पत्रे, भिंती व अन्य घराच्या भागातील नुकसान, व महावितरण चे पोल नुकसान झाल्याने संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांनी तहसीलदार किरण अंबेकर यांच्याशी सुसंवाद साधुन भेट देण्याची मागणी केल्यानंतर १७ मार्च रोजी सकाळी तहसीलदार अंबेकर व पथकाने भेट देऊन नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश दिले.

नांदेड तालुक्यातील भायेगाव येथील काल १६ मार्च रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी व गारपिट पावसामुळे गावातील जवळपास ९० हेक्टर शेती जमिनीवरील गहू, हरभरा, ज्वारी, यासह भाजीपाला यांच्ये नुकसान झाले असून महावितरणचे विघुत पुरवठा करणारे पोल व तारा प्रंचड सुटलेल्या वारा वादळा मुरे तुटून पडल्या असुन गावातील अनेक रस्ता लगत असलेले वृक्ष ऊन्मळून पडली आहेत तर गावातील जवळपास तिस घरे भिंती पडलेल्या अवस्थेत तर काही घरावर वृक्ष कोसळून संसार उपयोगी वस्तू व जिवनाशयक अन्नधान्य नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून संबधितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामपंचायत भायेगाव संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांनी तहसीलदार किरण अंबेकर यांच्या कडे केली होती.

मागणीची दखल घेत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार तहसिलदार किरण अंबेकर ,नायब तहसिलदार मुंजाजी काकडे ,मंडळ अधिकारी घुगे,तलाठी सुर्यवंशी ग्रामसेवक एस.एस.वाकोरे यांनी भेट देऊन गावात व शेती शिवारात प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व नुकसान ग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ याचा बाधीत झालेल्या घराचे नुकसान पंचनामा करण्याचे आदेश संबंधित यांना दिले.

यावेळी उपसरपंच बालाजी कोल्हे, अशोक पाटील कोचार,गंगाधर खोसडे,राजु पाटील खोसडे, शंकर खोसडे, संभाजी खोसडे, देवराव कोल्हे, प्रभु पाटील कोल्हे, शंकर पाटील कोचार यांच्या सह गावातील ग्रामस्थ, महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

