
उस्माननगर, माणिक भिसे। हाळदा ता.कधार येथे दि. १६ मार्च रोज गुरूवारी अचानक पाऊस आला असता शेतामध्ये कम करित असलेल्या ज्ञानेश्वर सदाशिव भालेराये वय (४० ) वर्षीय शेतकऱ्यांच्या अंगावर विज पडून ठार तर कौडगाव येथील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. धनज येथील शेतकऱ्यांने शेतात बांधलेल्या बैलावर वीज पडून मृत्यू झाला असून, गोळेगाव तपोवन येथील घरांचे नुकसान झाले. परिसरात होत असलेल्या अवकाळी पावसाने मोठे संकट निर्माण झाल्याने जनता हैराण झाली आहे.

काल व परवा आलेल्या अवकाळी पावसाने सर्व सामान्य जनतेला व शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. हाळदा येथील शेतकरी ज्ञानेश्वर भालेराव हा गव्हाचे पिक जमा करण्याच्या धावपळीत असताना दुपारच्या वेळी अचानक वातावरणात बदल होऊन वीजेच्या गडगडाटासह वारा आणि पाऊस सुरू झाला.सदरील शेतकरी गव्हाच्या पेंढ्या जमा करण्याच्या नादात असताना अंगावर वीज पडून त्याचा जागीच मृत्यू झाला, हे कळताच परिसरात सन्नाटा पसरला. त्याच्या पश्चात पत्नी,मुलगा,मुलगी असा परिवार आहे. ही बातमी समजताच उस्माननगरचे स.पो.नि.पी.डी.भारती व सहकारी यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला .

लोहा तालुक्यातील मारतळा व परिसरातील गावांमध्ये दि.१६ रोजी दुपारी तिनच्या नंतर विजेच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार पाऊस झाला पाऊणतास झालेल्या या पावसात वेगावान वाऱ्यासह बारीक गारांची देखील वृष्टी झाली असुन अनेक ठिकाणी पिकांची काढणी करुण ठेवलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर कौडगाव शिवारात शेतातील झाडा खाली असरा घेण्यासाठी थांबलेल्या दोन शेतकऱ्यांवर विज कोसळली असुन यातील गोविंदा दर्शने (वय ६० वर्षे) गंभीर जखमी झाला. त्यांची प्रकृती नाजुक असल्याचे समजते तर त्यांच्या सोबत असलेला शिवाजी भरकडे (वय ३८ वर्षे) हा देखील गंभीर जखमी झाल्याची समजते अशी घटना घडली तर दुसऱ्या घटनेत धनंज (बु) ता.लोहा येथील माधव काशीराम शिंदे या शेतकऱ्यांने नेहमी प्रमाणे शेतातील आखाड्यावर बैलांना बांधून ठेवले होते.अचानक आलेल्या अवकाळी पावसाह विजेमुळे दगावला असल्याची माहीती आहे.

आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट घोंगावत असुन पुढील १८ तारखेपर्यंत नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी ३० ते ४० किमी प्रति तास वेगाने वारे वाहुन विजेच्या कडकडाटासह, ढगाचा गडगडाट होऊन पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडुन व्यक्त केली जात आहे.

मारतळा परिसरातील जोमेगाव,धनंज (बु. )धनंज (खुर्द) कापसी, गोळेगाव, मारतळा कौडगाव वाळकी( खु.)वाळकी (बुद्रुक)डोलारा, कांजाळा, पिंपळदरी,सुगाव,वाका,कामळज,नांदगाव,चिंचोली,येळी,हातणी,डोणवाडा, उस्माननगर येथील शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये हाळद ,ज्वारी ,गव्हू , हारभरा आदी पिकांचे नुकसान झाल्यामुळे हताश झाला आहे. उस्माननगर व परिसरात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावासामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर लोहा तालुक्यातील गोळेगाव येथील संजय हरिहरराव देशमुख यांच्या घरावरील दोन लाखाचे टिन शेड उडुन गेल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीच हानी झाली नाही.

शेतात असलेल्या गहु,ज्वारी,हरभरा हाळद आदी पिंकाचे नुकसान झाले आहे. अनेक शेतातील उभा असलेला गहु आडवा पडला आहे कापुन ठेवलेला गव्हाचे पावसामुळे खुप नुकसान झाले आहे. दरम्यान वाका,हातणी,येळी आदी ठिकाणी असलेल्या विटभट्टीवरील विटांचे नुकसान झाले असुन आधीच ओल्या असलेल्या विटांचा चिखल होऊन विटभट्टी मालकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची शासनाकडुन भरपाई मिळावी व तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी आता शेतकऱ्यांतुन होत आहे.

