नवीन नांदेड। नांदेड तालुक्यातील भायेगाव राहेगाव किक्की पाच किलोमीटर रस्त्याच्ये निकृष्ट दर्जाचे दुरूस्ती काम अवकाळी पावसामुळे ऊखळले असुन हे काम बरोबर होत नसल्याचे संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर यांनी नांदेड दक्षिण विधानसभा आमदार मोहनराव हंबडे व संबंधित विभागाच्या अभियंता यांच्या निदर्शनास आणून देऊन काम थांबविले होते.
परंतु संबधितांनी पाहणी न करता पुन्हा चालु ठेवुन चालु केलेले काम अवकाळी पावसामुळे उखडून खड्डेमय होऊन पाणी साचले आहे, या बोगस कामाची दखल घेऊन पुन्हा दुरूस्ती करावे अशी मागणी होत आहे.
नांदेड तालुक्यातील हैद्राबाद मुख्य रस्ता लगत असलेल्या भायेगाव किक्की राहेगाव या पाच किलोमीटर रस्ता पंतप्रधान सडक योजना अंतर्गत गेल्या पाच वर्षापूर्वी झाला होता. निकृष्ट दर्जाचे कामामुळे अनेक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्याने हा रस्ता पुन्हा करण्यासाठी गेल्या आठ दिवसापासून डांबरीकरण रस्ता करण्यात येत होता. परंतु खड्डा भरण्यासाठी गिट्टी व डांबरीकरण , दबाई योग्य प्रमाणात होत नसल्याने भायेगाव संरपच प्रतिनिधी तथा शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख बालाजी पाटील भायेगावकर यांनी संबधित विभागाला तक्रार करून काम थांबविले.
पंरतु गुतेदार यांनी काम चालुच ठेवले परंतु काम चालुच ठेवून काम थातूर मातूर पूर्ण केले . १६ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले असुन अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. या निकृष्ट डांबरीकरण कामाची चौकशी करून पुन्हा हा रस्ता दुरूस्ती करावा. अशी मागणी करण्यात आली असुन संबंधित अभियंता विरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.