
नांदेड। जोशाबा मध्यवर्ती ग्राहक सहकारी संस्था मर्यादित जिल्हा नांदेडच्या वतीने येत्या 21 मार्च रोजी डेरला (धनगरवाडी) तालुका लोहा येथे दाल मिल उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी साडेअकरा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त टी. एल. माळवदकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असून जिल्हा उपनिबंधक विश्वासराव देशमुख यांच्या हस्ते दाल मिलचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, जिल्हा लेखापरीक्षक अधिकारी बैस ठाकूर, आयडीबीआय बँकेचे व्यवस्थापक कोडगिरे आदींची उपस्थिती राहणार आहे. तरी संचालक मंडळातील सदस्य, ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन चेअरमन उत्तम गवाले, सचिव एम.टी. वाघमारे व समस्त संचालक मंडळ जोशाबा यांनी केले आहे.

