कंधार,सचिन मोरे। कंधार पासून जवळच असलेल्या ग्राम पंचायत फुलवळ अंतर्गत सोमसवाडी ता. कंधार येथे लोहा – कंधार विधान सभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या निधीतून साकारलेल्या १० लक्ष रु सी.सी रोड कामाचे लोकार्पण शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले.
गावकऱ्यांच्या वतीने ढोलताशांच्या गजरात आणि शाळकरी विद्यार्थीनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले,यावेळी कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले,यावेळी शालेय विद्यार्थी हर्षदीप जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.उपस्थित गावकऱ्यांच्या वतीने सौ.आशाताई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमा प्रसंगी बोलताना आशाताई म्हणाल्या की,आमदार श्यामसुंदर शिंदे साहेबांच्या माध्यमातून लोहा-कंधार मतदारसंघाला ना भूतो ना भविष्यती इतका विकासनिधी खेचून आणला आणि लोहा कंधार मतदारसंघातील रस्ते, शिक्षण,आरोग्य, शेती आणि सिंचन या बाबतीत सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही शिंदे कुटुंबीय कट्टीबद्ध आहोत, फुलवळ ग्रामपंचायत अंतर्गत येथे आतापर्यंत ४६ लक्ष रुपयांचा निधी अंतर्गत विकासकामांना दिलेला आहे,लागेल तो निधी देण्याचा प्रयत्न आमदार साहेबांच्या माध्यमातून करेन अशा पद्धतीने लोहा कंधार मतदारसंघातील प्रत्येक गावांना विकास निधी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे,असे यावेळी आशाताई म्हणाल्या.
यावेळी गावकऱ्यांच्या अडी-अडचणी त्यांनी जाणून घेतल्या याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सौ.विमलताई मंगनाळे,सरपंच प्रतिनिधी, नागनाथराव मंगनाळे,कोंडीबा मोरे,शेकाप अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शेख शेरू भाई,माधव पाटील घोरबांड,सचिन पाटील कुदळकर,अवधूत पेठकर,उपसरपंच हणमंत पाटील जाधव,शेख मकदुंम, कार्यक्रमाचे आयोजक शिवाजी सोमासे, माजी सरपंच बालाजी देवकांबळे, पत्रकार विश्वंभर बसवंते,प्रवीण मंगनाळे,वसंत मंगनाळे,नागेश गोधने,महेश पांचाळ,विष्णू गलपवाड,संदीप मंगनाळे, दत्ता मंगनाळे ,मारोती जेलेवाड,सदाशिव पटणे,नवनाथ बनसोडे,श्रीकांत मंगनाळे,गणेश जाधव,गोविंद चव्हाण,दत्ता हरी शिंदे,शिवदास पाटील सोमासे,संभाजी सोमासे,वामन शिंदे,बालाजी थाटे,उत्तम सुर्यवंशी,माधव सोमासे,नारायण सोमासे,मारोती जल्लेवाड सह कार्यकर्ते, गावकरी व महिला उपस्थित होते.