नांदेड। आर्य वैश्य महिला महासभा नांदेड तर्फे दि.20 मार्च रोजी जागतिक महिला दिनीचे औचित्य साधून आर्किटेक्ट व इंटेरिअर डिझाईनर सौ. धनश्री गगन लाभशेटवार यांचा सत्काराचे आयोजन नांदेडच्या उत्सव बैंक्वेट हॉल वजीराबाद येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून डॉ. सौ. रचिता नंदकुमार बिडवई (MBBS, DGO) या उपस्थित राहणार असून, कर्तृत्वाने सिध्द केले स्त्रीचे अस्तीत्व, समाजसेवा तत्परतेने वाढवले तुमचे महत्व, आम्हाला आहे तुमचा सार्थ अभिमान, याचसाठी महिला दिनी तुमचा अध्यक्षाचा मान अशी उपमा दिली आहे.
तर सत्कारमूर्ती म्हणून सौ. धनश्री गगन लाभशेटवार (Architect & interior designer) तुझ्या प्रयत्नांची नभी झेप उत्तुंग यशाची सक्षम, कर्तव्यदक्ष, समर्थ स्त्री तू आजची उमटवलीस तूझ्या प्रतिभेची छबी मनोमनी म्हणूनच सत्कारमूर्ती तू आजच्या दिनी अशी उपमा यांना देऊन जागतिक महिला दिनी सत्काराला सादर आमंत्रित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच आयोजन आर्य वैश्य महिला महासभा नांदेडच्या अध्यक्षा सौ.सपना सं.नलबलवार, उपाध्यक्ष सौ. आरती मं. महाजन, सचिव सौ. अंजली म. पिंपरवार, कोषाध्यक्ष सौ. मुक्ता वि. फब्बा, नगर अध्यक्ष सौ.पल्लवी ग. महाजन, यांच्या वतीने करण्यात आले आहे.