
हिमायतनगर। कारला येथे दरवर्षी दक्षिण मुखी हनुमान मंदिराचा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संगीत भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या भक्तीमय सप्ताहाचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील कारला ग्रामस्थांच्या सहकार्यातून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संगीत भागवत कथेला आयोजन दि. 22 मार्च पासून प्रारंभ होणार असून 29 मार्च पर्यंत सप्ताह चालणार आहे. या सप्ताहातील कार्यक्रम संगीत भागवत कथा कथाचार्य प. पू. बालयोगी गजेंद्रजी चैतन्यजी स्वामी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून होणार आहे. सकाळी काकडा,भजन, ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 1 ते 4 संगीत भागवत कथा होणार आहे.

सायंकाळी हरिपाठ, रात्री 8 ते 10 हरिकीर्तन होणार त्यानंतर जागर भजन होईल. सप्ताहातील किर्तनकार ह. भ. प. चंद्रकांत महाराज लाठकर, ह. भ. प. माधव महाराज बोरगडीकर, ह. भ. प. पंजाबराव महाराज चालगणीकर, ह. भ. प. बाबुराव महाराज तेरकर, ह. भ. प. शिवाजी महाराज इंगळे, ह. भ. प. भिमराव महाराज फुटाणकर, ह. भ. प. दादाराव महाराज दिग्रसवार, यांचे होणार आहे तर काल्याचे किर्तन ह. भ. प. बालयोगी गजेंद्र महाराज यांचे होणार आहे.

ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ ह. भ. प. नाथा महाराज चव्हाण, ह. भ. प. कृष्णा महाराज लुम्दे, गायनाचार्य ह. भ. प. मारुती महाराज राहुलवाड, ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली बोटेवाड, ह. भ. प. एकनाथ महाराज आळंदीकर, ह. भ. प. आनंद महाराज, ह. भ. प. भगवान महाराज गुंफलवाड, मृदंगाचार्य ह. भ. प.साई महाराज सिबदरेकर, ह. भ. प.अशोक महाराज बोंपीलवार, तबलावादक ह. भ. प.राम महाराज मंगरूळकर, ह. भ. प.सचिन महाराज बोंपीलवार, हार्मोनियमवादक ह. भ. प.रामदासजी बोंपीलवार, ह. भ. प.चौपदार परमेश्वर महाराज, विणेकरी ह. भ. प.माधव महाराज मिराशे, ह. भ. प. दत्तरामजी चिंतलवाड, दि. 22 मार्च रोजी रात्री नादब्रह्म संगीत संचाचे सचिन बोंपीलवार, प्रा. ज्ञानेश्वर बोंपीलवार, कृष्णा बोंपीलवार, नामदेव बोंपीलवार यांच्या गायनाने भजन संगीत मैफिल होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताह व संगीत भागवत कथा सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कारला ग्रामस्थांनी केला आहे.

