Tuesday, March 21, 2023
Home क्राईम अट्रॉसिटी आणि कलम ४२० नुसार गुन्हे दाखल करावेत म्हणून २१ दिसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण व धरणे आंदोलन -NNL

अट्रॉसिटी आणि कलम ४२० नुसार गुन्हे दाखल करावेत म्हणून २१ दिसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण व धरणे आंदोलन -NNL

गुन्हे दाखल करण्यास वजीराबाद पोलीस अधिकारी उदासीन

by nandednewslive
0 comment

नांदेड। कंत्राटी कामगार जयराज गायकवाड व इतर कामगार दि.२३ फेब्रुवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण आणि धरणे आंदोलन करीत आहेत. त्यांच्या आंदोलनास २१ दिवस पूर्ण झाले आहेत. जयराज गायकवाड हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सभासद आणि सीटू संलग्न मजदूर युनियनचे पदाधिकारी आहेत.

ते नांदेड रेल्वे स्टेशन येथे जगदेव इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमध्ये रेल्वे स्वच्छता कामगार म्हणून कार्यरत आहेत. उप ठेकेदार मिलिंद लोंढे आणि व्यवस्थापक रवींद्र परनाटे व इतरांनी पाच ते सहा कामगारांचे आर्थिक शोषण करून जातीय द्वेषातून जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची व गंभीर स्वरूपाचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्ली आहे. पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड येथे रीतसर तक्रारी अर्ज देऊन सुद्धा गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे.

पीएनबी बँक शाखा महावीर चौक येथे रेल्वे सफाईदार कामगारांचे खाते उघडून त्यांच्या खात्यावर पगार टाकणे ही कायदेशीर प्रक्रिया आहे म्हणून बँकेत खाते काढले, परंतु एटीएम कार्ड आणि बँक पासबुक व्यवस्थापक रवींद्र परनाटे यांनी कामगारांना दिलेच नाही.एवढ्यावरच न थांबता कामगारांना पगार देखील दिला नाही आणि कामगारांच्या एटीएम कार्डचा परस्पर बेकायदेशीर वापर करून रक्कम उचलण्यात आली. पंजाब अँड नॅशनल बँकेच्या व्यवस्थापकास दि.२२/०९/२०२२ रोजी जयराज गायकवाड यांनी रीतसर अर्ज देऊन एटीएम कार्ड ब्लॉक करून नवीन कार्ड देण्याची मागणी केली. परंतु कार्ड ब्लॉक करण्यात आले नाही आणि त्या नंतर ही रवींद्र परनाटे आणि मिलिंद लोंढे यांनी परस्पर एटीएम कार्डचा वापर करून कॉ.जयराज यांचे व इतर कामगारांचे पैसे उचलले आहेत.

banner

दिनांक ८/११/२०२२ रोजी कॉ. जयराज गायकवाड,पंढरी बुरुडे, गोपीप्रसाद गायकवाड,सुभाषचंद्र गजभारे आणि इतर कामगारांनी पोलीस स्टेशन वजीराबादचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडारावार यांना लेखी अर्ज देऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. मात्र गैरर्जदारांना बोलावून मार्ग काढण्याचा सल्ला दिल्याने तसेच उप ठेकेदार मिलिंद लोंढे आणि व्यवस्थापक रवींद्र परनाटे यांनी दि.२८/१२/२०२२ रोजी १०० रुपयांच्या भारतीय गैर नायिक मुद्रांक पेपरवर करार नामा लिहून दिला असून, त्यामध्ये जयराज गायकवाड व इतर कामगारांचा पगार, एटीएम कार्ड आणि बँकेचे पासबुक व भविष्य निर्वाह निधीची रक्कम पोलीस स्टेशन मध्ये प्रभारी यांच्या समक्ष दि.२०/१/२०२३ रोजी देणार असा सुस्पष्ट उल्लेख आहे.

कामगारांना अंधारात ठेऊन परस्पर त्यांच्या बँक खात्यावरील रक्कम बेकायदेशीररित्या उचलून फसवणूक करणे हे पीएनबी बँक अधिकारी – कर्मचारी आणि गैर अर्जदार यांनी अनेक महिन्यापासून चालविलेले कटकारस्थान असून नांदेड जिल्ह्यात कामगारांना फसवून त्यांची रक्कम हडप करणारी टोळी आहे. जोखीम पतकरून गुन्हे गारांना जेरीस आणणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेत वर्णी लागणाऱ्यात प्रमुख दावेदार पदासाठी चर्चेत असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भंडारवार पीडित दलित अर्जदारांचा अर्ज का स्वीकारत नाहीत आणि अर्जा प्रमाणे गुन्हे दाखल का केले जात नाही हे संशोधणाचा विषय बनला आहे.

दि.२८ डिसेंबर २०२२ रोजी व्यवस्थापक रवींद्र परनाटे यांनी नांदेड शहरातील बीएसएनएल मुख्य कार्यालय ते महापालिका परिसरात जयराज गायकवाड यांना जातीवाचक शिवीगाळ करीत गुंड लावून जीवे मारण्याची धमकी दिली असून, त्या तारखेचे आम्हा दोघांचे ही मोबाईल लोकेशन पडताळणी करावी असे जयराज यांचे म्हणणे आहे.

सहा दिवस अमरण उपोषण आणि पंधरा दिवस साखळी उपोषण व धरणे आंदोलन पूर्ण झाले असून आम्ही टोकाचा मार्ग निवडावा का…? असेच प्रशासनास वाटत असेल तर लवकरच तेही करु असे आंदोलकांचे म्हणणे आहे. जो पर्यंत गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत तो पर्यंत कलेक्टर ऑफिस सोडणार नाही असेही गायकवाड म्हणाले.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!