
नवीन नांदेड। नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ संघातील व वाजेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ अंतर्गत असलेल्या गावात अवकाळी झालेल्या गारपीट पावसामुळे शेतकरी बांधवाचे झालेले नुकसान पाहण्यासाठी नांदेड दक्षिण चे आमदार मोहनराव हंबरडे व जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे व संबंधित गावाचे सरपंच यांच्या सोबत कृषी सहायक, तलाठी, ग्रामसेवक यांना सोबत थेट बांध यावर जाऊन नुकसान ग्रस्त पाहणी करून सुसंवाद साधुन पंचनामे करण्याचे आदेश दिले तर शेतक याचा व्यथा जाणून तात्काळ विज पुरवठा, जनावरे औषध उपचार आदी बाबत प्रशासनाला सुचना केली.


नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील किक्की, राहेगाव, भायेगाव,पुणेगाव, कांकाडी,वडगाव ,मिश्री पिपंळगाव,इंजेगा, काकांडी, वांगी, सिधदनाथ, पुणेगाव ,बोढार,त्रिकुट,ब्रमहणवाडा,झांजाची वाडी,हाळयाची वाडी,खडकुत व धनेगाव येथे २० मार्च रोजी सकाळी गावात भेट देऊन थेट शेतीवर जाऊन नूकसान झालेल्या कापुस, गहु, ज्वारी, ऊस, हरबरा, व भाजीपाला,फुल बाग,यासह वादळी वाऱ्यासह घराचे झालेले नुकसान व गारपीट,वृक्ष तुटून जनावरे झालेले जखमी आदीची पाहणी करून अनेक गावात खंडीत झालेला वीजपुरवठा, जखमी जनावरावर औषध उपचार यासह ग्रामस्थ यांच्ये झालेल्या शेती, घरे आदीचे पंचनामे करण्याचे आदेश संबधित प्रशासनाला दिले तर उपस्थित असलेल्या कृषी सहायक मगर, मंडळ अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक यांना सुचना देऊन तात्काळ पंचनामे करण्याचा सुचना दिल्या, यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा नांदेड तालुका काँग्रेस आय चे अध्यक्ष मनोहर पाटील शिंदे, बाभुळगाव संरपच पुंडलिक मस्के, यांच्या सह संबधित गावातील संरपच, ऊपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,जेषठ नागरिक,महिला ,युवक मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपल्या समस्या सांगुन तात्काळ मदतीची मागणी केली.


राहेगाव येथे गारपिट पावसामुळे अनेक जनावरे गंभीर जखमी झाल्याचे पाहून आमदार हंबडे हे गहिवरून गेले असून तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांना उपचारासाठी पथक तात्काळ पाठविण्याचे सांगितले तर महावितरण विभागाशी संपर्क साधुन लोबकाळलया तारा ताबडतोब दुरूस्ती करा असे सांगितले. यावेळी तलाठी सुर्यवंशी, सरपंच विलास पाटील इंगळे, उपसरपंच शशीकला बाई इंगळे,नागोराव इंगळे,चंद्रकांत इंगळे,नारायण इंगळे,ष
बालाजी इंगळे,किक्की येथे सरपंच रवि देशमुख, गोविंदराव देशमुख, अर्जुन देशमुख, भायेगाव येथे संरपच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर, उपसरपंच बालाजी कोल्हे, विठ्ठल पाटील खोसडे, निलेश भालके, माधवराव देशमुख, अशोक पाटील कोचार, शंकर शिंदे, विठ्ठल पाटील खोसडे यांच्या सह अनेक क गावातील ग्रामस्थ व जेष्ठ नागरिक महिला युवक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

