नांदेड। या देशपातळीवरील मानाची मानल्या जाणाऱ्या नॕशनल चॕम्पियनशिप २०२३ मध्ये आपल्या पावरफुल स्मॕश, डिफेंस व प्लेसिंगने संपुर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाने प्रभावित करणाऱ्या महाराष्ट्राच्या साक्षी, असद, अदनान यांना देशपातळीवर मानाचा मानला जाणारा देशातील सर्वोत्कृष्ट “इंडियाज स्टार २०२३ स्मॕश प्लेअर” हा पुरस्कार भारतीय महासंघाद्वारे देऊन गैरविण्यात आले.
भारताची गुलाबी नगरी जयपूर राजस्थान येथे स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यते अंतर्गत राजस्थान स्मॅश रॅकेट असोसिएशन यांच्या च्या वतीने आयोजित सिनीअर नॕशनल स्मॅश रॅकेट चॕम्पियनशिप २०२३ ची दिनांक १५ मार्च रोजी सुरूवात झाली होती. *आज झालेल्या स्पर्धेच्या अंतीम सामन्यात महाराष्ट्र पुरुष डबल्स संघाने तेलंगाना राज्य संघास सरळ २ सेट मध्ये हरवून पुरुष डबल्स प्रकारात देशात प्रथम येण्याचा मान मिळवला.या विजयी पुरुष संघात असद शेख व अदनान शेख यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले.
नॕशनल मिक्स डबल च्या अंतिम सामन्यामध्ये महाराष्ट्राच्या संघाने मध्यप्रदेश संघाचा पराभव करीत सुवर्णपदक प्राप्त केले. मिक्स डबल राष्ट्रीय विजेत्या संघामध्ये रोहिणी सुर्यवंशी , साक्षी रोकडे, असद शेख यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. नॕशनल महिला डबल्स मध्ये महाराष्ट्र संघाने आंध्र प्रदेश संघास सेमी फायनल मध्ये व मध्य प्रदेश संघास फायनल मध्ये अटितटीच्या सामन्यात हरवून देशात प्रथम क्रमांक मिळविला.
तसेच सांघीक प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या संघाने सेमी फायनल मध्ये तेलंगाना संघाला आणि फायनल मध्ये राजस्थान संघाला हरवून सुवर्ण पदक प्राप्त केले.महाराष्ट्राच्या सांघीक प्रकारामध्ये महाराष्ट्र पुरुष संघाच्या कर्णधारपदी विकास जायभाये तर महिला संघाच्या कर्णधारपदी निशा चिकणे यांनी संघाचे नेतृत्व केले. महाराष्ट्र पुरुष संघातअविनाश पाटील , असद शेख, अदनान शेख, तानाजी कदम, अय्युब जागिरदार, विकास जायभाये, फैजान शेख, अरशद शेख, तबरेज सय्यद, रितेश पेटकर, मिरान शिरवळकर, नय्युम शेख, रोहित गंडले, सोमनाथ राऊत, दिनेश वाघे, यशवंत मुकणे यांचा समावेश होता. तसेच महाराष्ट्राच्या महिला संघात निशा चिकणे, अश्विनी माळकार, शिवानी फड, आरती बाकळे, रोहिणी सुर्यवंशी, सिद्धेश्वरी जाधव, साक्षी रोकडे यांचा समावेश होता. महाराष्ट्राकडुन या स्पर्धेत पंच म्हणुन आमीर शेख यांनी उत्कृष्ट पंच म्हणून कार्य केले.
महाराष्ट्रा संघाच्या विजयात अविनाश पाटील, फैजान शेख, विकास जायभाये, अर्शद शेख, रोहिणी सुर्यवंशी , निशा चिकणे यांनी सांघीक विजयामध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रेक्षकांची मने जिंकली. नॕशनल स्मॕश रॕकेट चॕम्पियनशिप २०२३ चे उद् घाटन व बक्षीस वितरण अतिशय भव्य दिव्य स्वरूपात पार पडले. देशभरातून आलेल्या सर्व राज्यांतील खेळाडूंचा , पदाधिकारींचा , पंच व प्रशिक्षक यांचा राजस्थान राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. महेश जोशी, जयपुर शहराच्या महापौर श्रीमती मुनेश गुजर, स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष हिरानंद कटारिया, महासचिव मोहम्मद इकराम, राजस्थान राज्यसचिव मित्रोदय गांधी यांनी बक्षीस व पुरस्कार देऊन सत्कार केले.
महाराष्ट्राच्या या देशपातळीवरील विजयाबद्दल पोलीस अधिक्षक श्री श्रीकृष्ण कोकाटे सर, उप विभागीय पोलीस अधिकारी श्री डॉ सिद्धेश्वर भोरे, राज्य अध्यक्ष मा.मंत्री विनायकराव पाटील , उपाध्यक्ष ईम्रान खान, नईम शेख, श्री ज्ञानोबा भोसले, अकबर पठाण, संगमेश्वर निला, डॉ वैभव रेड्डी, डॉ पांडुरंग कदम, श्री भगवान धबडगे, शेख नुरसर , संजय उबारे, बाबा शेख, सुनिल शिंदे यांनी अभिनंदन करून पुढील यशस्वी कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.