
नवीन नांदेड। भावसार समाज सिडको नविन नांदेड व युनायटेड भावसार ऑर्गनायझेशन सिडको नविन नांदेड, भावसार महिला मंडळ सिडको नविन नांदेड च्या वतीने दरवर्षीप्रमाणे श्री हिंगुलांबिका देवी (कुलदेवतेचा)प्रगट दिन उत्सव मोठ्या जल्लोषात व उत्साहवर्धक वातावरणात साजरा करण्यात आला.


यावेळी श्री हिंगुलांबिका देवी प्रतिमेचे पूजन, आरती श्री विनोद सुत्रावे ,अध्यक्ष भावसार समाज सिडको नविन नांदेड यांनी सपत्नीक केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवराज पेंडकर ,माजी संचालक, एस.टी. सहकारी पतसंस्था नांदेड, बंडूराम गोजे संस्थापक सदस्य,प्रसिद्धीप्रमुख भावसार समाज सिडको नवीन नांदेड,ओमप्रकाश पेंडकर, संस्थापक सदस्य भावसार समाज सिडको नांदेड, पतंगे विश्वनाथ हे होते.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय पेटकर अध्यक्ष युनायटेड भावसार ऑर्गनायझेशन सिडको नविन नांदेड यांनी केले. यावेळी सर्व प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे भावसार युवा दिनदर्शिका देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी समाज बांधव,भाविक सहपरिवार, मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन पेटकर, विश्वानंद परळकर, राजू आंबेकर, सौ.शारदा सुत्रावे, सौ .विद्या पेटकर यांनी प्ररिश्रम घेतले.

