
अर्धापूर। मराठा समाजाचा वधू वर परिचय मेळावा मोठ्या थाटात, उत्साहात संपन्न झाला. यावेळी वधु वर परिचय मेळावा घेऊन यशस्वी करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन तानाजीराव भोसले यांनी केले.
अर्धापूर येथील लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालयात मराठा वधू वर परिचय मेळावा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष केशवराव पाटील इंगोले, उद्घाटक प्रणिता ताई देवरे चिखलीकर, प्रमुख पाहुणे- वसमतचे शिक्षण विस्तार अधिकारी तानाजीराव भोसले, प्रसिद्ध वक्ते प्रा.डॉ. हनुमंत भोपाळे, शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले, संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम , जि. प. मा. गटनेते नागोराव इंगोले, पं.स. मा. उपसभापती डॉ. लक्ष्मण इंगोले, भाऊराव चव्हाण कारखान्याचे संचालक बळवंत पाटील,तुळशीराम बंडाळे, यांच्यासह प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
समाजातील वधू वर परिचय मेळावा घेणे ही काळाची गरज झाली आहे. यासाठी समाजातील युवकांनी सहभाग घेतला पाहिजे, असे आवाहन प्रसिद्ध साहित्यिक, व्याख्याते प्रा.डॉ. हनुमंत भोपाळे यांनी सांगितले. लग्नकार्यात बँन्ड, डीजे, घोडा, फटाके, यासारखा गोष्टीवर अनावश्यक खर्च करू नका, लग्न करिता शेत जमिनी विकून नका, कर्ज काढू नका, साध्या पद्धतीने लग्न लावा, अनावश्यक खर्च टाळा असे आवाहन वसमतचे शिक्षण विस्तार अधिकारी तान्हाजी भोसले यांनी केले.
यावेळी दीप प्रज्वलन करण्यात आले, जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे आयोजन वृक्ष मित्र ईश्वर पाटील इंगोले, सुनील मिरजकर, निवृत्ती इंगोले,भास्कर इंगोले, विठ्ठल इंगोले, बंडू सरपंच,गजानन कदम, मारोती कदम, प्रशांत आबादार, सुरेश लखे,शंकर इंगोले,कृष्णा पाटील, मुरलीधर कदम, व्यकटराव कदम,वसंत ईंगोले,अमोल जोगदंड,गणेश इंगोले, पंडीत कदम,परसराम इंगोले,भगवान इंगोले,संतोष सोळंके व सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हादराव इंगोले यांनी केले तर सूत्रसंचालन दशरथ कदम यांनी केले तर आभार ईश्वर पाटील इंगोले यांनी मानले.