
नांदेड। नाशिक येथे संपन्न झालेल्या पाचव्या राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धत नांदेड येथील नायब तहसिलदार मुगांजी काकडे यांनी सुवर्ण ,व कास्य पदक पटकावले आहे. याबदल मित्र मंडळानी अभिनंदन केले आहे.


दि. 18 व 19 – मार्च रोजी नाशीक येथील वीर सावरकर जलतरणेवर 05वया राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धेचे आयोजन, मास्टर्स क्रिडा असोशिसन, उत्तर प्रदेश यांचे वतीने करण्यात आले होते या मध्ये देशातील विविध राज्यातील जलतरणपटू यांनी सहभाग नोंदविला होता, या मध्ये नांदेड येथील नायब तहसीलदार मुगाजी काकडे यांनी 200 मिटर बैकस्ट्रोक क्रिडा प्रकारात या सुवर्ण तर 100 मिटर बैकस्ट्रोक या क्रिडा प्रकारात कास्य पदक प्राप्त केले.


आमदार श्रीमती देवायांनी फरादे नाशिक व मान्यवरांचे हस्ते मुगांजी काकडे यांना प्रमाणपत्र, पदक देवून गौरविण्यात आले, महसुल विभागातील क्रिडा स्पर्धेत नेहमीच पदकांची लयलुट करणारे नायब तहसिलदार मुगांजी काकडे यांनी राष्ट्रीय पातळीवरील पारितोषीक प्राप्त केल्याने त्याचे महसूल अधिकारी कर्मचारी ,मित्र परिवारांचे वतीने अभिनंदन केले आहे.

