
नांदेड| होलीसिटी पब्लीक स्कुलमध्ये शिकत असलेल्या मीमांसा रूपेश पाडमुखला नुकत्याच झालेल्या शालेय खेळात गोल्ड व बॉन्झ मेडल मिळाल्याबद्दल प्रिन्सीपॉल मो.अर्शद सर यांच्यासह सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.


नांदेडपासून जवळच असलेल्या पासदगांव येथील होलीसिटी पब्लीक स्कुलमध्ये कु.मीमांसा पाडमुख इयत्ता सहावी वर्गात शिकत आहे. अभ्यासासह क्रिडा क्षेत्रातही अग्रेसर असणार्या मीमांसाने या अगोदरही अनेक पदके मिळवली आहे. नुकत्याच झालेल्या शालेय खेळात तिने हिरहिरीने भाग घेतला.


सरावा दरम्यान दुखापत झाल्यावरही तिने खो-खो आणि थ्रो बॉल या खेळात सहभाग घेऊन अनुक्रमे गोल्ड व ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले. तिच्या यशाबद्दल होलीसिटीचे संचालक राम सक्करवार, प्रिन्सीपॉल मो.अर्शद सर, पवार सर, वर्षा मॅडम, नेहा मॅडम यांच्यासह समस्त शिक्षकवृंद आणि आप्तस्वकीयांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.

