
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या अमूल्य जीवनाचे बलिदान दिलेल्या महान शहीद- ए- आजम भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या बलिदान दिनानिमित्त जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ. श्री हवा मल्लीनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात गुरुवार, दि. २३ मार्च २०२३ रोजी पंजाब राज्यातील पाकिस्तान सरहद्दीवर शहीद भगतसिंघ यांचे जन्मस्थान खटकर कालन येथे ऐतिहासिक देशभक्ती कार्यक्रम आयोजित केला आहे.


त्यानिमित्त बुधवार, दि. १४ मार्च २०२३ रोजी सकाळी गुलबर्गा (कर्नाटक) जिल्ह्यातील आळद तालुक्यात पानचिंचोली येथील जय भारत माता मंदिर येथून यात्रेला सुरुवात करण्यात आली. सदर यात्रा हुमनाबाद, उमरगा, तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर, भिगवण, शिर्डी, मालेगाव, नाशिक, धुळे, जबलपूर मार्गे मध्यप्रदेश, राजस्थान आणि हरियाणा मार्गे विविध राज्यातून ही यात्रा जाणार असून निःस्वार्थ भावनेने देशभक्तीचा संदेश देशभर घेऊन जाणारी ही देशभक्ती यात्रा आहे. या देशभक्ती यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश,
तेलंगणासह विविध राज्यातील हजारो भाविक वाहनांसह सहभागी झाले आहेत.


जीव महत्त्वाचा नाही, देश महत्त्वाचा आहे. देहपूजा करण्यापेक्षा प्रथम देशपुजा केले पाहिजे म्हणून समस्त देश बांधवांना शूरवीरांचे बलिदान स्मरणात रहावे या प्रमुख उद्देशाने हवा मल्लीनाथ महाराजांनी अमर बलिदान दिनानिमित्त पंजाब राज्यातील शहीदांच्या वारसांचा सन्मान व पाकीस्तान सरहद्दीवर शहीद गौरव करण्यात येणार आहे. भगतसिंग यांच्या जन्मस्थानी खटकर कालन येथे २३ मार्च रोजी सकाळी शहीद भगतसिंघ, सुखदेव, राजगुरू व देशातील इतर शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात शहीद भगतसिंघ, ‘सुखदेव, राजगुरु व इतर देशभक्तीपर विविध मान्यवरांचे विचार व देशभक्तीपर गीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


देशभक्तीपर गीत गायनाच्या कार्यक्रमात नायगाव तालुका नरसी येथिल भुमीपुञ देश भक्ती गीतांचा बादशाह सुप्रसिद्ध गायक श्याम गायकवाड नरसीकर हे देश भक्ती पर गीत गाणार आहेत. तसेच देशभक्ती पर गीत गायनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. असे जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय सदस्य सिध्दार्थ तलवारे यांनी कळविले आहे.
