
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। मांजरम येथील विविध सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली. नायगाव तालुक्यात सर्वात मोठ्या असलेल्या सोसायटी कार्यक्षेत्रात मांजरमसह केदार वडगाव, दरेगाव या गावाचा समावेश आहे.


मांजरम सोसायटीची निवडणुक लढवायची इच्छा अनेकांची होती आणि तशी मोर्चा बांधणीला सुरूवात झाली होती.परंतू सध्या सहकार क्षेत्राची मरगळ व सध्या परिस्थितीची जाणीव ठेवून सुज्ञ सभासदांनी बिनविरोध निवडीला पाठिंबा दर्शविला राजकीय हस्तक्षेप न होवू देता सामोपचाराने ही निवडणूक झाल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले. गावपातळीवरील प्रमुख युवा कार्यकर्ते यांनी सेवा सोसायटीचा कारभार तरूणांच्या हातात दिला आहे.


चेअरमन पदी शिवाजी नागोराव गायकवाड तर संचालक म्हणून शिवाजी शंकरराव शिंदे, प्रल्हाद तेजेराव शिंदे, राजेश आनंदराव शिंदे, व्यंकटराव बापुराव जाधव, वसंतराव आबाजी जाधव,प्रकाश अमृतराव माली पाटील, श्रीकांत दिगांबरराव शिंदे, सुवर्णमाला श्रीपत शिंदे, गोदावरी व्यंकटराव शिंदे, अर्जुन राजाराम मलदोडे, गोविंद नागोराव छपरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


यावेळी मनोज शिंदे,दिगांबरराव शिंदे, संभाजीराव शिंदे, शिवाजी जाधव, श्रीकांत माली पाटील, रामराव मलदोडे, व्यंकटराव शिंदे, नारायण माली पाटील, आनंदराव शिंदे, विठ्ठल शेट्टेवाड,माधव शिंदे, सुभाष माली पाटील यांच्या सह अनेकांनी सहकार्य केले.
