
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। आज गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव येथे युवा नेते रवींद्र पाटील चव्हाण यांनी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अडचणीवर गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली.


योजनेच्या मस्टर मागणीवर ग्रामसेवक स्वाक्षरी करत नाहीत व ग्रामसेवकाची स्वाक्षरी असल्याशिवाय गटविकास अधिकारी मस्टर वितरित करण्याची परवानगी देत नाहीत. त्यामुळे नायगाव तालुक्यातील सर्व सिंचन विहीर व जनावरांच्या गोठ्यांचे लाभार्थीयांना पंचायत समिती येथे वारंवार खेटे मरावे लागत आहेत. त्यांच्या अडचणीं सोडविण्यासाठी गट विकास आधिकारी व ग्रामसेवक संघटना पदाधिकारी यांची संयुक्तिक बैठक घेऊन होणाऱ्या जनतेच्या वरील आडचणीवर कायदेशीर तोडगा काढण्यासाठी विचारणा केले.


त्यावेळी टी.जी. पाटील रातोळीकर यानी. शाषन निर्णय वाचुन दाखवत मष्टर मागणी व मस्टर यावर ग्रामसेवक यांच्या स्वाक्षरीची आवश्यकता नसून ग्रामरोजगासेवक व (JE ) तांत्रिक कर्मचारी यांच्या संयुक्त सहीने मस्टर काढावेत असा ( jR ) संघटना सचिव सुर्यकांत बोंडले यांनी निर्दशनात आणुन दिले. त्यावेळी मा. गटविकास अधिकारी साहेब यांनी वरिष्ठ कार्यालयाकडून दोन दिवसात मार्गदर्शन मागून वरिष्ठांच्या सुचने प्रमाणे मस्टर काढले जातील व अडचणीत सापडलेल्या लाभार्थ्यांच्या समस्या त्वरित सोडवल्या जातील असे आश्वासन दिले. दालनामध्ये प्रा.रवींद्र चव्हाण, श्रीनिवास पाटील चव्हाण व संजय आप्पा बेळगे यांनी सविस्तर चर्चा केली.


ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांच्या चर्चेअंती लाभार्थ्याच्या मस्टरवर स्वाक्षरीच्या संदर्भात त्वरित दोन दिवसात मार्ग काढण्याच्या अनुषंगाने सकारात्मकता सुचना रविंद्र पाटील यांनी देऊन लवकरात लवकर मार्ग काढून लाभार्थ्यांना त्यांचा मोबदला त्वरित मिळवून देण्यात यावा असे सांगीतले यावेळी ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष टी. जी.पाटील रातोळीकर , सुर्यकांत बोंडले सचिव , रविराज नव्हारे मानदआध्यक्ष , नागेश यरसनवार उपाध्यक्ष ग्रामसेवक संघटना नायगाव सह बाबासाहेब शिंदे, पत्रकार मनोहर तेलंग तिजारे पाटील, धोंडजी पाटील बेंद्रीकर शंकर मालीपाटील ,रावसाहेब पाटील शिंदे इत्यादी उपस्थित होते.
