
नांदेड| हिमालयाच्या कुशीत असलेल्या नयनरम्य नेपाळला भेट देऊन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अर्ध ज्योतिर्लिंग पशुपतिनाथचे दर्शन घेतलेल्या ८६ यात्रेकरूंचे सकाळी नांदेड रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले.


११ दिवसात या जत्थ्याने नेपाळ मधील काठमांडू ,पोखरा ,मनोकामनादेवी ,लूंबिनी, भैरवा बॉर्डर तसेच भारताच्या गोरखपूर या प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.कोरोना मुळे दोन वर्ष खंड पडल्यानंतर या वेळेस मोठ्या उत्साहात ही यात्रा सुरु झाली.दिलीप ठाकूर यांच्या समवेत नांदेडसह मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, परभणी,हिंगोली,लातूर व किनवट येथील ७६ यात्रेकरू व ३ टूर मॅनेजर आणि ७ कॅटरिंग टीमचे सदस्य सहभागी झाले होते.सुरुवातीला बौद्ध धर्मातील चार पवित्र तीर्थस्थळापैकी असणारे गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान लुंबिनीला भेट दिली.


माया मंदिर, अशोक स्तंभ, वर्ल्ड पीस पॅगोडा तसेच १२ विविध देशानी बांधलेले बौद्ध मंदिरांची पाहणी केली.नेपाळ सर्वात रमणीय असणाऱ्या पोखरा मध्ये विंध्यवासिनी मंदिर, गुप्तेश्वर महादेव, देवी फॉल्स, फेवी लेक चा मनमुराद आनंद लुटला.आशियातील सर्वात मोठ्या केबल कारने जावून मनोकामना देवी या शक्तिपीठाचे दर्शन घेतले.नेपाळची राजधानी काठमांडू येथे पशुपतीनाथची विधिवत पूजा केली.भक्तपूर, दरबार चौक, स्वयंभूनाथ बुढा नीलकंठ ही प्रसिद्ध ठिकाणे पाहिली. एव्हरेस्ट सहित हिमालयातील प्रसिद्ध शिखरांचे नयन मनोहर दृश्य पाहण्यासाठी केलेल्या हवाई सफरीमुळे स्वर्गसुख मिळाल्याचा प्रत्यय सर्वांना आला.


काहींनी त्रिशूली नदीत रिव्हर राफ्टिंग चा रोमांचकारी अनुभव घेतला. गोरखपुर मध्ये योगी आदित्यनाथ पिठाधीश असलेले असलेले गोरखनाथ मंदिर पाहिले.धार्मिक ग्रंथ प्रकाशनासाठी प्रसिद्ध असलेल्या गीता प्रेस ला भेट दिली. यात्रेदरम्यान वातानुकूलीत तृतीय वर्गाचा रेल्वे प्रवास, प्रशस्त दोन एसीबसेस आणि राहण्यासाठी उत्तम हॉटेलच्या सुसज्ज रूम मध्ये यात्रेकरूंची व्यवस्था करण्यात आली होती.दिलीप ठाकूर यांनी वेळोवेळी घेतलेले मनोरंजक खेळ, अंताक्षरी,प्रत्येक प्रवाश्यांवर केलेले मार्मिक विनोद यामुळे प्रवासाची रंगत वाढली.ठाणे येथील कॅटरिंग टीमने रुचकर महाराष्ट्रीयन भोजन वेळेवर दिल्यामुळे बहुतेक जण जेष्ठ नागरिक असून देखील सर्वांची प्रकृती चांगली राहिली.

संदीप मैंद, किरण मोरे, विशाल मुळे यांनी योग्य नियोजन केले. प्रवासादरम्यान टूर मॅनेजर मिलिंद जलतारे ,लक्ष्मीकांत जोगदंडे यांनी सर्वांची वैयक्तिक काळजी घेतली.भाऊ ट्रॅव्हल्स व माय हॉलिडेज च्या वतीने सत्तावीस मार्चला रामेश्वर कन्याकुमारी,पाच एप्रिलला हिमाचल प्रदेश येथे रेल्वेने जाणारे टूर हाऊसफुल झाले आहेत.२४ एप्रिल ला गुजरातला जाणाऱ्या टूरच्या व २ जुनला चारोधाम यात्रेच्या काही जागाच शिल्लक असल्याची माहिती दिलीप ठाकूर यांनी दिली. दिलीप ठाकूर व त्यांच्या टीमने अंत्यत नियोजनबद्ध व्यवस्था करून स्वगृही सुखरूप आणल्याबद्दल सर्व यात्रेकरुंनी समाधान व्यक्त केले.
