
नांदेड| धम्मचळवळीला गतिमान करण्यासाठी भिक्खू संघाला आर्थिक दान करणे गरजेचे आहे. उपासकांच्या दानांतूनच श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात विविध कामे केली जाणार आहेत. त्यामुळे धम्मचळवळीत दान पारमितेस महत्व असल्याचे प्रतिपादन येथील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत इंजिनिअर भरत कानिंदे यांनी केले. ते तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात फाल्गुन पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव या कार्यक्रमात बोलत होते.


यावेळी येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो, भिक्खू श्रद्धानंद, भंते शिलभद्र, भंते सुनंद, भंते सुयश, भंते सुगत, भंते संघदिप भंते सुयश, भंते सुपत्ता, भन्ते सुमित, भन्ते सुजात, भन्ते गौतमरत्न, माता बुद्धसेविका, माता महाप्रजापती, डॉ . एन. के. सरोदे, डॉ. रवी सरोदे, से.नि. नायब तहसीलदार झगडे, प्रा. विनायक लोणे, प्रा. एस. एच. हिंगोले, धम्मदान आणि धम्मसंदेश यात्रेचे संकल्पक प्रज्ञाधर ढवळे, सुकेशिनी गायगोधने यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.


ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खुरगाव नांदुसा संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात फाल्गुन पौर्णिमेनिमित्त पौर्णिमोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूष्पपूजन झाल्यानंतर उपासकांच्या याचनेवरुन भिक्खू संघाने त्रिसरण पंचशील दिले. त्यानंतर त्रिरत्न वंदना झाली. सर्वांसाठी ध्यानसाधना घेण्यात आली. तत्पूर्वी सकाळपासूनच परित्राणपाठ, सूत्तपठण, गाथापठण, त्रिरत्न वंदना ध्यानसाधना धम्म ध्वजारोहण, भिक्खू संघाचे भोजनदान, बोधीपूजा आदी कार्यक्रम संपन्न झाले. धम्मदेसना देतांना भदंत पंय्याबोधी थेरो यांनी फाल्गुन पौर्णिमेचे महत्व विशद केले. दरम्यान, हर्दाड ता. उमरखेड येथील बौद्ध उपासक उपासिकांना थायलंडहून आणलेली पंचधातूतील चार फूट उंचीची बुद्धमूर्ती सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. त्यानंतर आर्थिक दान, फलदान कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी जनरेटर घेण्यासाठी वीस हजार रुपये दान जमा झाले.


मार्च महिन्यातील या पौर्णिमोत्सव कार्यक्रमासाठी इंजिनिअर भरत कानिंदे, भीमराव धनजकर, दीपक बनसोडे, वसंत वीर, देविदास भिसे यांनी उपस्थितांना भोजनदान दिले. तसेच भूतान धम्माभ्यास सहलीवरुन परतलेल्या बौद्ध उपासक उपासिकांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर शहरातील विश्वदिपनगरातील दोन्ही डोळ्यांनी अंध कलाकार प्रेरणा खंदारे यांचा माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनावरील एकपात्री प्रयोग प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात चांगलाच रंगला. यावेळी डॉ. अशोक खंडाळे, अशोक बनसोडे, इंजि. नारायण इंगोले, इंजि. सम्राट हटकर, इंजि. आर. एस. टोके, आकाश महाबळे, कचरे, मंदाताई पाटील, रोहिदास भगत, चंद्रकांत ढगे, रवी दवणे, दिगांबर हर्दडकर, किशोर कांबळे, भीमराव गायकवाड, रामराव बुक्तरे, डॉ. खाडे यांच्यासह नांदेड, हिंगोली, परभणी जिल्हा व परिसरातील बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेवटी बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम आणि भिक्खू संघाच्या आशिर्वाद गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.

यांचा झाला सन्मान….
बौद्ध राष्ट्र भूतान दस दिवशीय धम्माभ्यास सहलीवरुन परतलेल्या पद्मावती हर्दडकर, दिगांबर हर्दडकर, शकुंतला सावते, शांताबाई खंदारे, आशालता शिंदे, सीताबाई हटकर, कांताबाई पांगरेकर, द्रौपदी कांबळे, रेखा सावते, रत्नप्रभा जाधव, सिताराम जाधव, श्रीराम जाधव, रोहिदास भगत, पद्मीनबाई भगत, सुनंदा चांदणे, भिक्षुक चांदणे, इंदिरा भोरगे, सुधा भवरे, प्रज्ञा बडोले, भीमराव बडोले, लक्ष्मीबाई गायकवाड, भीमराव गायकवाड, जीवानंद गायकवाड, श्रेयस गायकवाड, प्रफुल्लता वाठोरे, शकुंतला नरवाडे, मीना नरवाडे, आळणे आई आदींचा सत्कार करण्यात आला.