Monday, May 29, 2023
Home मुदखेड खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतला मुदखेड तालुक्यातील गारपीटीचा आढावा -NNL

खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी घेतला मुदखेड तालुक्यातील गारपीटीचा आढावा -NNL

गारपीटग्रस्तांना तातडीची मदत पंचनामे करण्याचे दिले आदेश

by nandednewslive
0 comment

नांदेड| मुदखेड तालुक्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे घरांची पडझड झाली आहे .गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि मूलभूत सुविधा तात्काळ पुरवाव्यात असे निर्देश खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिली आहेत. मुदखेड तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयात गारपिटीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी संबधित विभागाला आदेशित केले.

मुदखेड तालुक्यात दिनांक 16 मार्च रोजी झालेल्या गारपीट, वादळीवारे आणि आवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. टरबूज ,खरबूज, केळी, हरभरा, गहू ,बागायती शेती फळबागा, भाजीपाला , फुळशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे .अनेक भागात झालेल्या गारपिटीमुळे पशुधनही दगावले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घराची छपर कोसळली तर अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली. झोपड्यांचे प्रचंड नुकसान झाले . तब्बल चाळीस मिनिटे झालेल्या गारपिटीने शेती उध्वस्त झाली आहे. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्तांना तातडीची आर्थिक मदत मिळवून देण्याच्या अनुषंगाने आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज दिनांक 18 मार्च रोजी मुदखेड तालुक्यातील वासरी, आमदुरा, मुगट, इजळी, निवघा, डोंगरगाव या गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. शेतकरी आणि ग्रामस्थांची संवाद साधला . त्यांचे प्रश्न आणि अडीअडचणी समजून घेतल्या .

त्यानंतर खा. प्रतापराव पाटील चिखलीकर आणि मुदखेड येथे तहसीलमध्ये दुपारी बारा वाजता तालुक्यातील झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या . ज्या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे त्या भागात तातडीने वीज पुरवठा सुरू करावा ,पाणीपुरवठा सुरळीत करावा, मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश दिले आहेत. गारपीटीचे पंचनामे तातडीने करावेत आणि अहवाल सादर करावा. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण राज्य सरकारशी संपर्क करून मुदखेड तालुक्यातील प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकरी, पशुधन मालक आणि कुटुंबांना आर्थिक मदत मिळवून दिली जाईल. त्यामुळे शेतकरी ,नागरिक आणि पशुधन मालक यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. राज्य आणि केंद्र सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिला.

यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मराज देशमुख, भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड.किशोर देशमुख, माजी सभापती बाबुराव हेंद्रे, गांधीजी पवार, भाजपा तालुका अध्यक्ष शंकर मुतकलवाड, माजी जि.प.सदस्य गणेशराव शिंदे, गोविंद गोपनपले, हनमंतराव देशमुख, केशवराव पवार, डॉ.अमोल ढगे, श्रीकांत किन्हाळकर, पुरुषोत्तम चांडक, विलास कल्याणे, गजानन कपाळे, माजी सभापती प्रल्हाद हाटकर, सभापती म्हैसाजी भांगे, गोविंराव खानसोळे, प्रविण गायकवाड, शंकर पवार, आनंदराव पवार, नारायणराव पवार, दिलीपराव देशमुख, अशोक पवार, शंकर पवार, गणेश यळंमकर, सुहास पाटील डोंगरगावकर उपविभागीय अधिकारी सुजित नरहीरे जिल्हा कृषी अधिक्षक चलवदे, तालुका कृषी अधिकारी कपाळे गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे, पोलीस निरीक्षक आनंत्रे, बारडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक थुगावे महावितरणचे उपविभागीय अधिकारी देशमुख, नायब तहसिलदार संजय नागमवाड व संबंधीत विभागचे प्रमुख उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!