
नवीन नांदेड। श्रीराम मंदिर संस्थान रामनगर सिडको नांदेड येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा दि.२२ ते ३१ मार्च दरम्यान संपन्न होत आहे. या सोहळ्यात हभप भागवताचार्य अरविंद मुळे महाराज आपल्या सुमधुर वाणीतून श्री शिव पुराण सादर करणार आहे. विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.


दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याच्या ३२ व्या सोहळ्यात संगीत शिव पुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे, हभप अरविंद मुळे महाराज यांच्या समधुर वाणीतून 23 ते 29 मार्च दरम्यान दुपारी दोन ते सहा या वेळेत ही कथा सादर करण्यात येणार आहे. यजमान म्हणून श्री व सौ. आनंदराव बासटवार हे आहेत.


या सप्ताहात २२ ते ३१ मार्च श्री रामाचा पवमान अभिषेक, आरती नित्य पाठ, व ३० मार्च रोजी श्रीराम जन्मोत्सव सोहळया निमित्ताने राम जन्म हभप भागवताचार्य अरविंद मुळे, दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव उत्सव, व सायंकाळी रामाची शोभा यात्रा मंदिर ते शिवाजी चौक परिसरात काढण्यात येणार आहे. ३१ मार्च रोजी महाआरती व त्यानंतर दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीराम मंदिर संस्थान विश्वस्त मंडळ रामनगर सिडको यांनी केले आहे.

