
हिमायतनगर| भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या अध्यक्षपदी पत्रकार अनिल नाईक यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र प्रदेश अध्यक्ष आय.एन. देवकर यांनी हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे संपन्न झालेल्या एका बैठकीत त्यांना दिले आहे.


नवनियुक्त कार्यकारीनीत उपाध्यक्ष म्हणून शे खय्युम, संघटक सदाशिव पतंगे, कार्याध्यक्ष नितीन राठोड, सहसंघटक शंकर बरडे, सचिव रमेश वाघमारे यांचाही निवडीत समावेश आहे. यावेळी प्रदेश अध्यक्ष आर. एन. देवकर, जिल्हाउपाध्यक्ष लक्ष्मण सुरवेसकर, प्रदेश सचिव बाळासाहेब रेनकर, अखिल भारतीय पत्रकार संघटना जिल्हा उपाध्यक्ष शुध्दोधन हनवते यांची उपस्थिती होती.


यांच्या निवडीबद्दल हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

