
नांदेड| श्री गुरुदत्त प्रतिष्ठान संचलित पांगरी रूरल डेन्टल कॉलेज आणि रिसर्च सेंटर कडून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विध्ययपीठाच्या बाजूला असलेले पांगरी या गावामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला . दरवर्षी 20 मार्च हा दिवस जागतिक मौखिक आरोगयदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षीची थीम होती, “आपल्या तोंडाचा अभिमान बाळगा “


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विध्ययपीठाच्या बाजूला असलेल्या पांगरी या गावामध्ये जागतिक मौखिक दिनाचे औचित्य साधून, हा दिवस आगल्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला. यावेळी कार्यकर्माचे प्रास्ताविक कु तेजस्विनी जगताप पाटील यांनी केले.व मौखिक आरोगयाबद्दल माहिती नगरिकाना दिली. त्यानंतर कॉलेजच्या विदहयार्थीनीनी पथनाट्य सादर करून, मोखीक आरोग्यविषयी प्रबोधन केले.


हा सर्व कार्यक्रम प्रजा दंत विभागाचे मुख्य डॉ. राजेशकुमार सर,यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नांदेड डेन्टल कॉलेजचे व्यवस्थापक श्रीनिवास कासवा , प्राचार्य डॉ भद्राराव सर,आकाशवणीचे प्रासंगिक निवेदक आनंद गोडबोले, डॉ. प्रसाद जोहरे, डॉ. क्रांतीलल इंगळे,डॉ. दीपाली , डॉ. मंजिरी गोडबोले, डॉ. श्रुती, सरपंच हणमंत घोगरे ,उपसरपंच गिरीश पंगरीकर,मुख्याध्यापक नलवलवर ,सहशीक्षक शिवकण्या कुंभारगावे यांच्या सहकाऱ्यातून यशस्वी झाला.


नागरिकाना मोफत ब्रशचे वाटप
पांगरी येथील नगरिकाना गारोघरी जाऊन, श्री गुरुदत्त प्रतिष्ठान संचलित पांगरी रूरल डेन्टल कॉलेज आणि रिसर्च सेंटर कडून मोफत ब्रशचे वाटप करण्यात आले. व साहित्याच्या आधारे दात कसे साफ करावे याबद्दलची माहिती विध्यार्थ्यानी दिली.
