
हिमायतनगर, अनिल मादसवार| साडेतीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त असलेल्या गुढी पढावा सण तीन वर्षाच्या कोरोना काळानंतर बळीराजाने दुष्काळ व आर्थिक संकटाचा सामना करत मोठ्या आनंदाने साजरा केला आहे. शहरातील श्री परमेश्वर मंदिरात भाविकांनी चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी सकाळपासून दर्शन घेऊन घराघरात पूजा अर्चना करून गुढी उभारून नववर्षाची मुहूर्तमेढ रोवली असल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे. दरम्यान शहरात आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट देऊन अनेकांना गुढीपाढव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


हिमायतनगर शहराचे आराध्य दैवत श्री परमेश्वर मंदिरात परंपरेनुसार विधिवत पूजा अर्चना करून गुढी उभारण्यात आली. ग्रामीण परिसरात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बळीराजाने पारंपारिक पद्धतीने काळ्या आईची पूजा अर्चना करून नववर्षाची मुहूर्तमेढ रोऊन शेती कामांना प्रारंभ केला. तर गृहिणींनी घरी उंच गुढी उभारून घरा – दाराला आंब्याचे तोरण बांधून शेजारच्यांना गोड जेवण देवून वनभोजनाचा आनंद लुटल्याचे चित्र, चैत्र शुद्ध एकादशी दि.२२ मार्च रोजी सर्वत्र दिसून आले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात काळ्या कसदार जमिनीत तास करून ऋषभ राजाला म्हणजे सर्जा – राजाला भोजन देऊन शेती कामाला प्रारंभ केला आहे. शहरासह विविध ठिकाणी अनेक व्यावसायिकांनी नूतन व्यवसाय, नूतन बांधकाम शुभारंभ, आणि या शुभमुहूर्तावर विविध संकल्पना ठेऊन विविध शुभकामाना सुरुवात करण्यात आली आहे.


हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी सकाळी पारंपरिक पद्धतीने आपल्या शेतात सर्जा – राजाची पूजा अर्चना करून शेतात तास धरून माझ्या मतदार अनाघातील शेतकऱ्यांना सूयकाः, समृद्ध ठेव, यंदाचे नवीन वर्ष भरभराटी देणारे ठरो. तसेच संकटाच्या काळात बाळ मिळो अशी कामना केली. त्यानंतर त्यांनी हिमायतनगर शहरास भेट देऊन प्रमुख मंदिरात दर्शन घेतले. तसेच शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांना मराठी नववर्ष गुढीपाढव्याच्या शुभेच्छा दिल्या. अनेक ठिकाणी त्यांच्या हस्ते अनेक नवीन प्रतिष्ठानचा शुभारंभ करण्यात आला. तर सोशल मिडीवरयी गुढीपाडवा निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देत आनंदाने गुढीपाढवा साजरा झाला असल्याचे दिसून आले.


भारत हा कृषीप्रधान असुन, या देशातील शेतकरी कष्टकरी असल्याने सर्वात जास्त धान्याची संपत्ती असलेला देश म्हणुन ओळखला जातो. वयोवृद्द जानकारच्या रुढीपरंपरेनुसार व श्रीरामाने रावणाचा वध करुन मिळवीलेला विजय व आयोध्येला परत आलेला दिवस म्हणुन गुढीपाढवा सन साजरा केला जातोय. १४ वर्षाच्या वनवासनंतर प्रभुरामचंद्र घरी परतले म्हणून तमाम जनतेनी घरो-घरी गुढया तोरणे उभारुन मोठ्या उत्साहात स्वागत केले. तोच दिवस गुढीवाडवा म्हणुन आजही साजरा केला जातो. या नवीन वर्षात शेतकरी आपल्या शेतीच्या अवजारांची पुजा करुन सर्व कामाला सुरुवात करतात. चैत्र शुध्द प्रतीपदेला शेतातील धन-धान्य घरात आल्याच्या आनंदाने घरा-घरात गुढ्या तोरणे उभारुन गृहलक्ष्मीच्या हस्ते गुढीची पुजा केेली जाते. साडेतीन मुहुर्तापैकी एक मुहुर्त असल्यामुळे अनन्य साधारण मंहत्व असलेल्या मराठी नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात यशश्री, आरोग्य, मांगल्य, माधुर्य, वैभव, सामर्थ, संकल्प, सौभाग्य, सिध्दी, स्थैर्याची गुडी – तोरणे उभारुन मुहुर्तमेढ साधली जाते.

या मराठी नववर्षाच्या दिवसापासुन रामनवमी, हनुमान जयंती, महाविर जयंती आदिंसह विविध मराठी सनांची रेलचेल सुरु होते. तसेच वसंत ऋुतुच्या आगमनाने जंगल परिसरातील झाडांची पानगळी होऊन वृक्षांना नवी पालवी फुटते. परिसरातील काही वृक्ष नव्या पालवीने बहरल्यामुळे ते वृक्ष वाटसरुंचे लक्ष वेधुन घेत आहेत. तसेच चाफा, गुलमोहर, काटशेवरी, पळसफुले, गणेरी, शेवंती, पांगरा, गुलाब आदिंसह रंगीबेगंरी फुलांची झाडे बहरल्यामुळे वसंत ऋतुने भर-भरुन निघल्याचे चित्र पाढव्याच्या मुहुर्तावर दिसुन आले आहे. यंदा ऐन हातातोंडाशी आलेल्या रब्बी पिकांवर निसर्गाने घाला घातला. नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे बळीराजा आर्थिक संकटात असताना देखील माताही नववर्षाच्या दिवशी सर्व दुःख विसरून आनंदाने गुढीपाढव्यापासून शेती कामाला प्रारंभ केल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळाले आहे.
