
हदगाव, शे.चादपाशा| हदगाव शहरात सोमवारी शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांच्या भेटीने तालुक्याच्या राजकीय क्षेत्रांत खळबळ माजली असुन, त्यांचा थेट संबध यापुर्वीच तालुक्यातील विविध कार्यकर्ते यांचेशी व्यक्तिकरित्या असल्यामुळे त्याच्या भेटीने माञ वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. यामुळे राजकीय वातावरण माञ ढवळून निघाले आहे.


ते २६ मार्च २०२३ रोजी नादेड जिल्ह्यातील लोहा येथील बाजार मैदानात होणाऱ्या तेलंगणाच्या भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेंलगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बी.आर.एस मध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ते हदगाव विधानसभा क्षेञातील जनतेला निमंञित करण्यासाठी आले होते. त्या निमित्तानं एका छोटेखानी बैठकीच आयोजन नेते जाकेर चाऊस यांनी केल होत. या बैठकीनंतर त्यांनी पञकाराच्या विविध प्रश्नाना उत्तरे देतांना सागितले की, मी तेलगंणाच्या BRS पक्षाचा अभ्यास केल्यानंतरच या पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे.


यात प्रामुख्याने शेतकऱ्यांना वीज २४ तास मिळते कालव्याने तसेच कालव्यातुन विद्युत मोटारीने सिंचनसाठी शुन्य पाणी योजना राबवून 50%शेतजमीन बागायती खाली आणलेली आहे. शेतीमालाचे २४ तासात पैसे तेही शेतक-याच्या बँक खात्यात देण्याची सुविधा जे तेलंगणा राज्याला जमु शकते ते महाराष्ट्राला का जमु नये. ज्या तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आमच्या शिष्टमंडळला आठ तास देवू शकतात. अस आपल्या राज्यात का घडू नये. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची तशी इच्छा व दृष्टी नाही अस एका प्रश्नांच्या वेळी त्यांनी सागितले. बाभळीच्या प्रश्नांवर त्यांनी सागितले की, त्या पेक्षा चांगले बंधारे बाधण्याचा तेलगणाचे मुख्यमंत्री यांचा विचार असुन, तो निधी ही तेलगणा सरकार खर्च करेल. त्या करिता महाराष्ट्राच्या नेत्याकडे या बाबतीत वेळ नसल्याचे शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी सागितले.


मी पक्ष का बदलतो – जाकेर चाऊस….
आपण पक्ष का बदलता या पञकाराच्या प्रश्नावर नेते जाकेर चाऊस यानी उत्तर देतांना सागितले की, मी प्रामुख्याने ज्या पक्षात प्रवेश केला. तिथे केवळ सर्वसामन्य कार्यकर्त्यांचा वापर केवळ निवडणूक पुरताच दिसुन आला. त्यात सर्वसमाजाचे प्रामुख्याने माझ्या समाजाच्या गरीब दलित व इतर समाजाच्या सर्वसामन्य कार्यकर्त्यांना काहीच मान मिळत नव्हत. जेव्हा गोरगरीब तेलगंणाच्या के.सी.आर. सरकारने राज्यात राबविलेल्या योजनाचे अवलोकन करतात ज्यामध्ये कल्याण लक्ष्मी व शादीमुबारक योजने अतर्गत मुलीच्या लग्नाकरिता एक लाखाची मदत. प्रत्येक दलित परिवाराला त्याच्या व्यवसायाकरिता १ लाखचे अनुदान जे तेलगणा राज्याला जमु शकते. ते महाराष्ट्रला का जमु नये..? असा सवाल ही त्यांनी पञकार परिषदेत केला.
