
नांदेड| भाजपाचे लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर आपले राजकीय वजन दिल्लीदरबारी वापरुन नांदेड लोकसभा मतदारसंघातील 41 कॅन्सरग्रस्त रुग्णांना पंतप्रधान सहाय्य निधीतून आतापर्यंत 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिल्यामुळे रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. एवठ्या मोठ्या प्रमाणात पंतप्रधान अर्थ सहाय्य उपलब्ध करुन देणारे मराठवाड्यातील एकमेव खासदार ठरले आहेत हे विशेष!


सन 2019 च्या लोकसभेच्या निवडणूकीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ऐतिहासीक विजय प्राप्त केला. दिल्लीतील संसद भवनात खासदारकीची शपथ घेतल्यापासून ते आजपर्यंतच्या तीन वर्षाच्या खासदारकीच्या कार्यकाळात चिखलीकरांनी मतदारसंघातील विकास कामांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करुन आणला आहे.


देशाच्या पंतप्रधानपदाची दुसर्यांदा सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा देशातील ज्या 27 खासदारांना आपल्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी आमंत्रीत केले होते त्यात महाराष्ट्रातून नांदेडचे भाजपा खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिल्यांदा भेट झाल्यानंतर खा.चिखलीकर यांनी नांदेड-बीदर या नविन रेल्वे मार्गास मंजूरी द्यावी अशी एकमेव मागणी केली होती. नांदेड भाजपाचा खासदार म्हणून चिखलीकर यांच्या मागणीकडे पंतप्रधानांनी विशेष लक्ष्य केंद्रीत करुन नांदेड-बीदर रेल्वे मार्गास मंजूरी देवून रेल्वे पिंकबुकमध्ये नोंदही करण्याचे आदेश संबंधितांना दिले.


राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने या रेल्वे प्रकल्पास लागणारा पन्नास टक्के निधीची वाटा राज्य सरकार उचलण्यास तयार असल्याचे हमी पत्रही केंद्र सरकारकडे देवून राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूदही करुन टाकली.ही मागणी मंजूर करुन घेण्यासाठी ज्या काँग्रेसच्या खासदारांना पन्नास वर्षात जे जमलं नाही ते नांदेडचा भाजपा खासदार म्हणून चिखलीकरांनी अवघ्या तीन वर्षात करुन दाखविले हे विशेष!

नांदेड लोकसभा मतदारसंघातील गोरगरीब लोकांना कॅन्सर, र्हदयरोग आदि गंभीर आजाराने ग्रासलेल्या 41 रुग्णांनी खा.चिखलीकर यांच्याकडे पंतप्रधान सहाय्यता निधी उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. त्या सर्व रुग्णांना तब्बल 1 कोटी रुपयांचा अर्थसाहय्य उपलब्ध करुन देवून चिखलीकरांनी फार मोठा दिलासा दिला आहे. रुग्णांना कमीत कमी 50 हजारापासून ते 3 लाखापर्यंतचा निधी उपलब्ध करुन देण्यात खा.चिखलीकर यांना यश प्राप्त झाले आहे.

मार्च 2023 या महिन्यात खा.चिखलीकर यांच्या प्रयत्नाने नागनाथ नामदेव अदमनेकर रा.कुंडलवाडी यांना दीड लाख, सुरज संतोष पाटील रा.कोळनूर वसुर ता.मुखेड यांना 3 लाख, शेख गफार शेख अख्तर रा.गोविंदनगर नांदेड यांना 2 लाख 85 हजार, मालोजी दाऊजी हनमंते रा.श्रावस्तीनगर नांदेड यांना 2 लाख रुपये कॅन्सर बीमारीच्या विलाजासाठी उपलब्ध करुन दिले आहेत. महमद अख्तर महमद दस्तगीर रा.पिरबुर्हान नांदेड यांना 50 हजार तर मनोज बबन कदम रा.विरगांव यांना 50 हजार रुपये अर्थसहाय्य मिळवून दिले आहे. पंतप्रधान सहाय्यता निधी 1 कोटी रुपये 41 रुग्णांना मंजूर करुन देणारे मराठवाड्यातील एकमेव खा.चिखलीकर हे ठरले आहेत हे विशेष!
