
नांदेड| शिर्डी साईबाबाच्या धर्तीवर नांदेड जिल्ह्यातील साई भक्तांना नांदेड येथेच दर्शनासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून धनगरवाडी साईनगर येथे साईबाबा मंदिर स्थापना करण्यात आले. साईबाबा मंदिर स्थापनेचा पाचवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा असून या निमित्त दिनांक 26 मार्च रोजी हरिभक्त पारायण श्री सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या भव्य कीर्तनाचा आणि त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


नांदेड जिल्ह्यातील आणि तेलंगणा, कर्नाटकातील साई भक्तांना नांदेड येथे साई दर्शन उपलब्ध व्हावे यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शिर्डी येथील साईबाबा च्या धरतीवर धनगरवाडी लोहा रोड वर भव्य मंदिर उभारून साई मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. दिनांक 26 मार्च रोजी साई मंदिराचा पाचवा वर्धापन दिन असून यानिमित्त हरिभक्त पारायण सोपान महाराज सानप शास्त्री यांच्या भव्य कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य कीर्तन सोहळा पार पडेल. याच वेळी महाप्रसादाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कीर्तन सोहळ्यास आणि महाप्रसादास भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्यासह माजी सभापती बालाजीराव पाटील मारताळेकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव केंद्रे उमरगेकर, बोरी बुद्रुकचे सरपंच बालाजीराव झुंबाड , धनगरवाडी चे सरपंच अमित संजय पगडे यांनी केले आहे.

