
नायगाव, रामप्रसाद चन्नावार। मातंग समाजातील निर्भीड व निष्कलंक व्यक्तीमत्व असलेले सामाजीक कार्यकर्ते राजेंद्र मारोती रेड्डी यांची ‘मातंग अस्मिता संघर्ष सेना’ या संघटनेच्या नायगाव तालुका संपर्कप्रमुख म्हणून नुकतीच निवड करण्यात आली रेड्डी यांच्या निवडीमुळे त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून विविध क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.


नायगाव तालुक्यातील सामाजीक कार्यकर्ते राजेंद्र रेड्डी हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांची नायगाव तालुक्याच्या संपर्क प्रमुखपदी निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले सदर निवडीबद्दल राजेंद्र रेड्डी यांचे सर्व स्तरातून स्वागत होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

