
हदगाव, शे.चादपाशा| राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने गुढीपाडवाच्या सणासाठी रेशन धारकांना आनंदाचा शिधा रवा, साखर, तेल, चनाडाळ शंभर रुपयांत देण्याचे ठरविले होते. पण गुढी पाडवाच्या दिनी आनंदचा शिधा मिळालाच नाही. सर्वसामान्यांना गुढीपाडव्या पूर्वी आनंदाचा शिधा मिळेल किंवा नाही ? याबाबत रेशन धारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.


महागाईची झळ नको म्हणून राज्य शासनाने ही शिधा संच देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी दिवाळीत काहींना दिवाळीनंतर आनंदाचा शिधा मिळाला होता. आनंदाचा शिधा होता त्या पाकिटावर राज्याचे मुख्यमंत्री वउपमुख्यमंत्र्यांचे फोटो होते.


महाराष्ट्र सरकारने गुढीपाडवाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेला आनंदाचा शिधा अद्यापही पुरवठा विभागाला प्राप्त झालेल नाही. त्यातच मागील चार-पाच दिवसांपासून महसूल विभागाचा संप असल्यामुळे अधिक कर्मचारी संपात असल्यामुळे प्रक्रियेत विलंब झालाचे सागण्यात येते. त्यामुळे लगेच आनंदाचा शिधापुरवठा विभागाला उपलब्ध होईल व लगेच दुकानदारांना देण्यात येईल अस पुरवठा विभागाकडुन सागण्यात येते.


गरिबांना मराठी नवीन वर्षाला शिधापत्रिका धारकांना १०० रु संच पुरवठा विभागाला उपलब्ध होणार होत अन् गुढीपाडव्याला मिळेल अशी अपेक्षा होती मिळेल आनंद चा शिधा मिळेल की नाही नाही, याबाबत शंका-कुशंकांना ऊत आला आहे.कारण गुढी पाडवाच्या दिवशी आनंदचा शिधा न मिळाल्या मुळे रेशनधारकात नाराजी दिसुन येत आहे.
