
नांदेड| महाराष्ट्र जीवन प्राधिककरण मंडळ व विभागामार्फत नांदेड येथील कार्यालयाच्या प्रांगणात जागतिक जलदिन साजरा करण्यात आला.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता तथ मुख्य अभियंता लोलापोड , विभागीय कार्यकारी अभियंता रमेश इंगळे व प्रमुख वक्ते म्हणून डॉ.हरिशंकरराव पातोडे, प्रा.डॉ. ओमप्रकाश दरक, दिपक मोरताळे, रवि ढगे व वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ.भालचंद्र संगनवाड आदींनी पाण्याचा सुयोग्य वापर व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करुन पाण्याचा अपव्यय टाळण्याबाबत शपथ घेण्यात आली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचलन उप विभागीय अभियंता एम.एस.बोडके यांनी तर आभार उप विभागीय अभियंता एस. डी.जंगम यांनी केले. कार्यक्रमास म.जि.प्रा.चे भूजल विभागाचे कर्मचारी, शासकीय गुत्तेदार यावेळी उपस्थित होते.

