
नांदेड/हिमायतनगर| जिल्हा परीक्षेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून सौ.वर्षाताई ठाकुर घुगे यांचा कार्यकाळ चागला गेला आहे. त्यातही प्रशासक म्हणून एक वर्षांचे त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे हिमायतनगर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले.


जिल्हा परिषदेच्या प्रशासाक म्हणून एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल कैलास पाटील माने पोटेकर, विजयकुमार घोगरे, हिमायतनगर तालुका सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांनी तिरुपती बालाजी चे कॅलेंडर, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन भाविकार्यास शुभेच्छा दिल्या.


गोपतवाड यांनी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी ठाकुर घुगे यांचा एक वर्षाच्या प्रशासकिय काळात हिमायतनगर तालुक्याच्या भेटित आपल्या कला कौशल्याची जाणीव करून दिली.त्याच्या कार्यकाळात सहकारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.त्याचा एक वर्षाचा कार्यकाळ आठवणीत राहिल असेच आदर्शवत कार्य असल्याचे सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड म्हणाले.

