
नवीन नांदेड। सिडको व हडको परिसरातील श्री. भगवान बालाजी मंदिर संस्थानाचा मंदीरात गुढीपाडवा निमित्ताने फुलाजी सजावट, रोषणाई, अभिषेक यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी परिसरातील व ग्रामीण, शहरी भागातील भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.


गुढी पाडव्याच्या निमित्ताने हडको येथील श्री भगवान बालाजी मंदिर संस्थान येथे २२ मार्च रोजी सकाळी पुजारी इद्रमुनी दुबे, प्रकाश महाराज यांनी विधीवत पुजा केली या वेळीअजिवन अभिषेक सह गुढीपाडवा निमित्ताने जवळपास भक्तांचे ५० महा अभिषेक करण्यात आले, यावेळी मंदिर परिसरात शिवराज तांबोळी यांनी फुलांनी सजावट केली तर यजमान वैभव बालाजी लालमे दिवसभर भक्तांसाठी साखर भात महाप्रसादाचे वाटप केले.


विश्वस्त समितीचे अरूण दमकोडंवार, बि. आर. मोरे, करणसिह ठाकूर, माणिकराव देशमुख, त्र्यंबक सरोदे ,दिलीप कदम, यांच्या सह पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. सिडको येथील श्री. भगवान बालाजी मंदिर येथे गुढीपाडवा निमित्ताने सकाळी पुजारी दिपक महाराज यांनी विधीवत पुजा केली यावेळी अजिवन अभिषेक सह गुढीपाडवा निमित्तानेजवळपास पन्नास भाविक भक्तांचे महाअभिषेक केले,


पाडव्याच्या निमित्ताने मंदिर परिसरात रोषणाई व फुलाजी सजावट करण्यात आली होती, दिवसभर भक्तांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले, यावेळी मोठया संख्येने सकाळपासून भाविक भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती, विश्वस्त पदाधिकारी साहेबराव जाधव, डॉ. नरेश रायेवार,व्यंकटराव हाडोळे, पुंडलिक बिराजदार, पवार व पदाधिकारी यांच्यी उपस्थिती होती. गुढीपाडवा निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
