
नवीन नांदेड। 52 महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेड तथा जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता. मुखेड संचलित शिवाजी विद्यालय, सिडको.नांदेड येथे G-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने विद्यालयाच्या एनसीसी विभागाकडून पर्यावरण संरक्षण व संवर्धन या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.


आणि याच विषयावर सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण संरक्षण व संवर्धन’ या विषयावर आपले मत मांडले व ‘पर्यावरण संवर्धन’ या विषयावर आपली मते व्यक्त करून सहभाग नोंदविला.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य प्रा.एस.एम.देवरे यांनी भूषवले. तर प्रमुख पाहुणे म्हणून नरसिंह प्राथमिक विद्यामंदिर सिडकोच्या मुख्याध्यापिका श्रीमती एकुंडवार,श्रीमती ए. जी.देगावकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनसीसी विभाग प्रमुख श्री एस.आर.भोसीकर यांनी केले कार्यक्रमांसाठी एनसीसीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य एस.एम.देवरे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनसीसी विभाग प्रमुख भोसीकर यांनी केले.

