
नवीन नांदेड। सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत २३ मार्च गुरूवार रोजी परिसरातील कापड, किराणा, भाजीपाला, हातगडे आदी ठिकाणी तपासणी करून प्लासटीक कॉरीबग जप्त करण्यात आली असून सात हजार रुपये दंड लावण्यात आला आहे.


मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने,अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम मुख्य उपायुक्त स्वछता सुनकेवार , स्वच्छता निरीक्षक वसीम तडवी ,क्षेत्रीय अधिकारी डॉ.रयोसोधदीन व स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे,अर्जुन बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको क्षेत्रिय कार्यालय क्रमांक 06 प्रभाग क्रमांक 19, 20 अंतर्गत दि. २३ मार्च रोजी कापड, किराणा दुकान हातगाडी इत्यादी ठिकाणची तपासणी करून सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केल्याबद्दल अंदाजे 7000 सात हजार रुपये इतका दंड लावण्यात आला.


व (25kg) (70gm) कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या आहेत, व भाजीपाला विक्रेते यांच्या कडेही तपासणी करण्यात आली आहे. या केलेल्या कार्यवाही मुळे हातगाडी फळे , भाजीपाला विक्रेता सह व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

