
नांदेड/मुंबई। हिमायतनगर येथील रहिवासी व सध्या मुंबई महानगरपालिकेत प्रभारी निरीक्षक (शिक्षण विभाग) येथे कार्यरत असलेले संजय सदाशिवराव चव्हाण यांना युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका या विद्यापीठाकडून मानद डी.लीट. ही पदवी प्राप्त झाली आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


गेल्या पंधरा वर्षापासून मुंबई येथे इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना केलेले वेगवेगळे उपक्रम, 2021 मध्ये नवीन सरकारी सीबीएसई शाळा सुरू करणे व प्रवेश प्रक्रिया राबवणे , विविध शालेय उपक्रम व शैक्षणिक कार्य या आधारे बेंगलोरच्या श्री. सर्वपल्ली राधाकृष्णन एज्युकेशनल रिसर्च सेंटर यांनी शिफारस केल्याप्रमाणे त्यांना मानद डी.लीट. ही पदवी मिळाली आहे. याबाबत त्यांनी सर्व सहकारी , मार्गदर्शक अधिकारी वर्ग यांचे आभार मानले आहेत.


मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग इंग्रजी माध्यम शाळा- प्रशिक्षक – 2007 , मुख्याध्यापक -2014 , 2021 मध्ये मुंबई पब्लिक स्कूल (सीबीएसई) घाटकोपर मुंबई ही नवीन शाळा सुरू केली. मुख्याध्यापक म्हणून नोव्हेंबर 2022 पासून आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या 11 CBSE, 1 ICSE, 1 IB व 1 केंब्रिज बोर्डाची शाळा असे एकूण 14 आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळांचा प्रभारी निरीक्षक म्हणून कार्य करत आहेत.


श्री. संजय चव्हाण हिमायतनगरचे रहिवाशी असून, त्यांचे , पाचवी ते बारावी ( 1995-2002) – नवोदय विद्यालय शंकर नगर , शैक्षणिक पात्रता – MA MBA PGDSLM BED DED DSM असून, त्यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेतले. आई वडिलाची हालाखीची परिस्थिती होती. संजय चव्हाण यांनी बारावी नंतरचे शिक्षण ट्युशन्स क्लास स्वावलंबनातून घेतले. कोल्हापूर येथे शिक्षण घेण्यासाठी हिमायतनगर येथे लोक वर्गणी करुन त्यांना 15 हजार ए.आर. अनगुलवार यांनी 18 वर्षापुर्व मिळवून दिले होते.

संजय चव्हाण यांनी काबाड कष्ट, जिद्द, सतत अभ्यास यामुळे आज त्यांना उतुंग यश मिळविले आहे. संजय चव्हाण यांना युनिव्हर्सिटी आॅफ सेंट्रल अमेरिका या विद्यापिठाकडून मानद डी.लीट पदवी मिळाल्याबदल आ. माधवराव पाटील जवळगावकर, परमेश्वर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीर सेठ श्रीश्रीमाळ, सेवानिवृत मुख्याध्यापक एन.के. अक्कलवाड, माजी जी प सदस्य समदखाॅन पठाण, सुभाष राठोड, संजय माने, सुभाष शिंदे, प्रकाश शिंदे, सह त्यांच्या मिञपरिवाराने अभिनंदन केले आहे.
