Friday, June 9, 2023
Home नांदेड देशातील लोकशाही धोक्यात- माजी मंत्री डी. पी. सावंत -NNL

देशातील लोकशाही धोक्यात- माजी मंत्री डी. पी. सावंत -NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड| काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई करण्यात आली असून ईडी, सिबीआय अशा शासकीय यंत्रणेचा गैरवापर यातून देशातील लोकशाही धोक्यात आली असल्याची टीका माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी मोदी सरकार केली आहे.

लोकसभा 2019 च्या,निवडणुकीवेळी मोदी आडनावावर केलेल्या टीकेनंतर सूडबुद्धीने काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांना अटक करत कारवाइ केली होती. याप्रकरणी गुरुवारी सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर त्यांना लगेचच जामीनही मिळाला. या संपूर्ण घटनेनंतर आज लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा वायनाडचे खासदार राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व अर्थात खासदारकी रद्द केली. विशेष म्हणजे न्यायालयाच्या निर्णयानंतर चोवीस तासांच्या आत ही कारवाई करण्यात आली आहे. राहुल यांच्यावरील या कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे.

शुक्रवारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मंत्री डी. पी. सावंत ,जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांच्या नेञत्वात आयटीआय येथील महात्मा जोतिबा फुले पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी माजी आ. ईश्‍वरराव भोसीकर ,आनंद चव्हाण,माजी सभापती संजय बेळगे ,प्रदेश सचिव ॲड.सुरेंद्र घोडजकर,संजय लहानकर ,विजय येवनकर,किशोर स्वामी,बाळासाहेब बारडकर,उमेश चव्हाण,सुभाष रायबोलेसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्याची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना माजी मंत्री डी. पी. सावंत म्हणाले की, लोकशाही वाचवण्यासाठी तुरुंगातही जायला आम्ही तयार आहोत यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलीसांनी अटक केली. आंदोलनात राजेश यन्नम,विठ्ठल पावडे,शरद पवार,शिवाजी धर्माधिकारी,संघरत्न कांबळे,रविंद्रसिंघ बुंगई,मनोहर पवार,बालाजी मुद्देवाड, संभाजी भिलवंडे,ललिता कुंभार,खुशाल सातूरकर, माणिक कोंडिबा देवकते,दत्तात्रय शिंदे, सुभाष घबडगे,रामराव गोरठेकर,देवराव पांडागळे,बालाजी पांडागळे,कमलाकर शिंदे,गणेश पवळे, अजित पांडागळे,संतोष मुळे,सचिन सत्रे, दिपक पाटील,चांदू चमकुरे,माधव पाटील कदम, पिंटू पाटील लोमटे, राहूल कोसल्ये,मुनवर शेख, गंगाधर आडे,शरद पाटील,उत्तमराव महाले,व्यंकटराव घोडके, सुधाकर देशमुख,केशव मुंगले,बालाजी कदम,यशवंत राजगोरे सेलगावकर, ललिता कोकाटे, देबडवाड,

घरटे, विठ्ठल रामजी गोरे,पंढरीनाथ मेटरगे,संतोष पुंडलिकराव जाधव,सुभाष थोरात, छायाताई कळसकर, रजिया बेग,अर्पणा नेरलकर,लक्ष्मण जाधव,राजाभाऊ कोतावार, सुनिल अटकोरे, सुनिल देशमुख बारडकर,शशीकांत क्षीरसागर,शहाजी क्षीरसागर,संतोष मोतीराम कोडलेवार, शिवाजी पाटील, अब्बासाहेब निकम,उध्दवराव पवार, बालाजी लहाने,व्यंकटेश शिवदोरे,हजप्पा पाटील, संभाजी भिलवंडे, म.अन्वर हुसेन अ.अन्नु,अब्दुल अखिम, सोनाजी साखरे,आनंद भंडारे, संतोष देशमुख, दत्तराम शिंदे,गंगाप्रसाद बारडकर, केरबा सूर्यवंशी,मारोती पईतवार,दादाराव पुयड,आत्माराम वंजावार, मनोहर पवार, बालाजी मुद्देवाड,बालाजी देवकते, गणेश पवळे, संदिप राठोड,संजय मोरे, उमेश पवळे, दयानंद वाघमारे, बालाजी शेट्टे,जगदीश शहाणे,मनोहर पवार,संतोष कपाटे,निलेश बारडकर,दिपकसिंह हुजुरिया, दिनेश यादव, स.रहीम स.रज्जाक,विनोद महादव कांचनगिरे आदींचा सहभाग होता

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!