नांदेड| नादुरुस्त ड्रेनेज लाईनचे पाणी रस्त्यावरुन नागरिकांच्या घरात शिरत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मनपाने तात्काळ ड्रेनेजची दुरुस्ती करावी अशी मागणी विनायकनगर गृहनिर्माण संस्थेच्यावतीने मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
येथील विनायकनगर भागात ड्रेनेज लाईन नादुरुस्त झाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ड्रेनेजचे रस्त्यावरुन वाहणारे पाणी आता नागरिकांच्या घरात शिरत आहे. त्यामुळे या वस्तीतील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. वातावरणातील बदलामुळे सध्या सर्दी, ताप, खोकला, जुलाब सारख्या आजारांचे शहरात रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत.
त्यातच ड्रेनेजचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरुन घरात येत असल्याने या भागातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मनपा प्रशासनाने तात्काळ ड्रेनेज दुरुस्त करुन द्यावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी मनपा आयुक्त सुनिल लहाने व अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर श्री विनायकनगर गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष स.अमरजितसिंघ जज, ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, सतीष कळणे, बालाजीराव कदम, सरुबाई धमने, ललिता कुंभार, देविदास कदम, भगवान पवळे, विमलबाई एकाळे, निता जोशी यांच्या स्वाक्षर्या आहेत.