
नांदेड। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका वतीने शहरातील महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने मोफत ऑटो प्रशिक्षण शिबिर सुरुवात करण्यात आले होते. आथिर्कदृष्ट्या दुर्बल, गरजू व होतकरू अश्या १५ महिलां व युवतींनी ऑटो प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्या नंतर त्यांना प्रत्यक्ष व्यवसायास सुरुवात करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त (महिला व बालकल्याण) डॉ पंजाब खानसोळे यांनी ऑटो प्रशिक्षित महिलांची बैठक घेतली.


उपायुक्त डॉ पंजाब खानसोळे यांच्या हस्ते ऑटो प्रशिक्षण घेतलेल्या १५ महिलांना ऑटो चालविण्याचा परवाना देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपायुक्त डॉ .पंजाब खानसोळे यांनी प्रशिक्षण घेतलेल्या महिलांचे अभिनंदन करून, तुम्ही आता स्वतःच्या पायावर उभे राहुन परिवाराला आर्थिक मदत करण्यास तयार सक्षम झालेले आहात असे मत व्यक्त केले.


महापालिकेने मोफत ऑटो प्रशिक्षण दिल्याबद्दल महिलांनी दिल्या बद्दल मा.आयुक्त डॉ सुनिल लहाने साहेब यांचे आभार मानले. यावेळी प्रशिक्षित महिलांनी आम्हाला विविध योजना/ बॅके मार्फत अर्थ सहाय्य देऊन ऑटो खरेदीस सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली,या बैठकीस सहाय्यक आयुक्त सुधीर इंगोले, अशोक सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

