Monday, May 29, 2023
Home क्राईम नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या शौचालयात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ -NNL

नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या शौचालयात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ -NNL

नागरिकांनी अफवार विश्वास ठेवू नये पोलिसांनी केलं आवाहन

by nandednewslive
0 comment

नांदेड। रेल्वे स्टेशनवर गुरुवारी सकाळी 10 वाजता एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुई धागा विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका अनोळखी महिलेचा रेल्वेच्या शौचालयात संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेसच्या शौचालयात हा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून, घटनेबाबत विविध तर्क वितर्क वाढविले जात आहेत. मात्र नागरिकांनी अफवार विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नांदेड रेल्वे स्थानकातून नांदेड-मुंबई तपोवन एक्सप्रेस क्रमांक 17618 रेल्वे दररोज ये-जा करते. गुरुवारी सकाळी 07 वाजेच्या सुमारास तपोवन एक्सप्रेस धर्माबादहून नांदेड रेल्वे स्टेशनवर दाखल झाली. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे जाण्यासाठी ही रेल्वे प्लॅट फॉर्मवर उभी होती. दरम्यान रेल्वेच्या डी-8 या कोचमधील शौचालयामध्ये एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नांदेड रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश उनावणे यांनी तात्काळ आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा समोरील दृश्य पाहून त्यांनाही धक्का बसला. त्या महिलेच्या तोंडातून रक्तस्त्राव होतं होता. तसेच, महिलेच्या उजव्या गालावर खरचटलेले होते. महिलेच्या शरीरावर इतर जखमा देखील आढळून आल्या होत्या. मृतदेह विष्णुपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. मयत महिला ही 30 ते 35 वर्ष वयोगटातील असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

हा प्रकार घातपाताचा आहे की…? अन्य काही या बाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत मयत महिलेची ओळख पटली नाही. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, महिलेचा मृत्यू कसा झाला हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. अचानक रेल्वे डब्यातील शौचालयामध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने रेल्वेत एकच खळबळ उडाली असून घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोशल मीडियावर या बाबतची माहिती व्हायरल होते आहे, या संदर्भात जोपर्यंत अधिकृत माहिती पुढे येत नाही तोपर्यंत कोणत्याही अफवार नागरिकांनी विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!