
हदगाव, गजानन जिदेवार। मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली रजिस्टर भारत सरकार राष्ट्रीय अध्यक्ष विजयजि कुराडे यांच्या आदेशाने व प्रवीण हरी गायकवाड एच आर यांच्या शिफारसीनुसार आणि मुस्तफा पठाण यांच्या पुढाकाराने हादगाव तालुक्यातील मौजे शिबदरा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार महेंद्र धोंगडे यांची मानव विकास संरक्षण समिती नवी दिल्ली नांदेड जिल्हा अध्यक्षपदी व पळसा येथील समाजसेविका सविताताईं नीमडगे यांची नांदेड जिल्हा महिला अध्यक्षपदी आज दिनांक 23 मार्च 2023 रोजी पळसा येथे त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.


यावेळी हदगाव तालुका महिला अध्यक्षपदी म्हणून अनिताताई काळे यांची निवड करण्यात आली या कार्यक्रमात उपस्थित रामदास काळे योगेश ठाकरे महा 24 तास न्यूज चैनल चे कार्यकारी संपादक श्री मारुती काकडे तळेगावकर महिला व पुरुष उपस्थित होते.


नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष श्री महेंद्र धोंगडे यांना आमच्या प्रतिनिधीशी संपर्क केला असतांना बोलताना संस्थेचे आभार मानले व जिल्ह्यामध्ये मानव विकास संरक्षण समिती जिल्हाभर पोहोचविण्याचे काम सदैव करीन व जिल्ह्यातील अन्याय अत्याचाराच्या विरोधात व भ्रष्टाचाराच्या विरोधात मी आवाज उठवून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचे काम करेल माझ्यावर जे साहेबांनी विश्वास टाकला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे बोलून त्यांनी आपले मनोगत स्पष्ट केले.

