
भोकर, रवी देशमुख। सेवा समर्पण परिवार च्या वतीने देण्यात येणाऱ्या मराठवाडा स्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून संध्या व दत्ता बारगजे यांना सेवा समर्पण समाजसेवा तर जेष्ठ पत्रकार तथा साहित्यिक आसाराम लोमटे यांना सेवा समर्पण साहित्य पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.


सेवा समर्पण परिवार च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दि.२५ मार्च रोजी भोकर व कामनगाव येथे महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची महिती सेवा समर्पण परिवार चे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड यांनी दिली. सेवा समर्पण परिवार च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त मागील वर्षी पासून सामाजिक बांधिलकी जोपसणाऱ्यांना पुरस्कार दिला जातो. यावर्षी एच.आय. व्ही.ग्रस्तांचे पालनकर्ता तथा इन्फन्ट इंडिया चे सर्वेसर्वा श्री व सौ.संध्या दत्ता बारगजे (पाली.जि.बीड) यांना मराठवाडा स्तरीय सेवा समर्पण समाजसेवा पुरस्कार तर परभणी येथील जेष्ठ पत्रकार आसाराम लोमटे यांना सेवा समर्पण साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


या पुरस्काराचे स्वरूप रोख ११ हजार, मानपत्र, सन्मानचिन्ह असे राहणार आहे.पुरस्कार वितरण सोहळा २ एप्रिल रोजी शहरातील दिगंबराव बिंदू महाविद्यालयाच्या सभागृहात होणार आहे. या सोहळ्यास डॉ. श्रीपाल सवनीस, माजी मंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर, नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे,उपमुख्यमंत्री कार्यालयातील अव्वर सचिव राजेंद्र खंदारे यांच्या हस्ते पार पडणार आहे. या बरोबरच दि.२५ मार्च रोजी भोकर व कामनगाव येथे महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.


शिबीराचे उद्घाटक जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महंत उत्तमबन महाराज, तहसीलदार राजेश लांडगे, उमरी पंचायत समितीचे माजी सभापती शिरीष देशमुख गोरठेकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
