
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। शहरातील बौद्ध भूमी परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त साफसफाई करतांना एका झूडपात ५०० रुपयाच्या ८७ हजाराच्या बनावट नोटा सापडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे.


माहूर शहरातील वार्ड क्र.३ मधील बौद्ध भूमी परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त साफ सफाईचे काम करतांना सुनील दत्ता कांबळे याला झुडपात ५०० रुपयाच्या १७४ नोटांचे बंडल दिसून आले.सदरची बाब त्याने नगरसेविकेचा मुलगा आकाश कांबळे यांना सांगितली.


नोटांच्या कागदाची जाडी, फिकट रंग, मध्ये असणाऱ्या पट्टीची चमक (सेक्युरिटी थ्रेड रिबिन) आणि आडव्या रेषांची जाडी यामध्ये फरक दिसून आल्याने ह्या नोटा बनावट असल्याचे दिसून आल्यानंतर या विषयी आकाश रमेश कांबळे यांनी माहूर पोलिसात तक्रार दिली.


पोलिसांनी ५०० च्या एकूण १७४ नोटा जप्त करून अज्ञात आरोपी विरुद्ध शुक्रवार दिनांक २४ शुक्रवारी रात्री ७.४५ मिनिटाला कलम ४८९ (अ) भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे व पो. नि. डॉ. नितीन काशीकर यांचे मार्गदर्शनात स. पो. नि. संजय पवार हे पुढील तपास करीत आहेत.
