
उस्माननगर। शिराढोण येथील व परिसरातील नामवंत प्रसिद्ध छायाचित्रकार कै. राजू धोंडिबा आळणे ( 45 ) यांच्या परिवारास श्री.श्री.श्री.१००८ जगद्गुरु भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वीजी केदारनाथ यांच्या वतीने आर्थिक मदत करून आळणे परिवाराचे सात्वन केले.


शिराढोण ता.कंधार येथील व परिसरात नावलौकिक फोटोग्राफर म्हणून परिचित असलेले राजू धोडींबा आळणे वय. ( ४५ )याचे नुकतेच १८ मार्च २०२३ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले होते. आळणे परिवाराचे सात्वन करण्यासाठी जगद्गुरु श्री श्री 1008 भीमाशंकर लिंक महाराज भेट देऊन सातवाहन केले. आळणे कुटुंबांची अतिशय हालाखीची गरिब परिस्थिती आसतांना देखील त्यांनी कष्टाने आपला प्रपंच चालवला .नम्र स्वभाव आसणारे आळणे लहानपणापासून ते थोरांपर्यंत मैत्रीचे नाते निर्माण केले होते.म्हणून ते सर्वांचे आवडते फोटोग्राफर म्हणून होते.


तसेच भिमाशंकरलिंग महास्वामीजी केदारनाथ जगद्गुरुंचे ते निस्सीम भक्त होते. त्यांनी भिमाशंकर मठसंस्थान व जगद्गुरुंची मनोभावे सेवा केली. आपल्या भक्ताच्या अचानक जाण्याने त्याचे कुटुंब उघड्यावर पडल्यामुळे श्री श्री श्री भिमाशंकरलिंग महास्वामीजी तथा भिमाशंकर मठसंस्थान शिराढोणचे मठाधिपती यांनी आज गुढीपाडव्याच्या दिवशी एक लक्ष रुपये( मदत ) गुरुदक्षिणा म्हणून देण्याचा संकल्प केला.आळणे कुटूंबांना वेळप्रसंगी मदत करू असे आश्वासन दिले.


यावेळी मठसंस्थान मध्ये व्यंकटराव माली पाटील , सरपंच खूशाल पाटील पांडागळे ,गणपतराव आप्पा देवणे , तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव आप्पा देवणे , मारोतराव पांचाळ , मुक्ताराम पाटील पांडागळे, शिवाजी देवणे सर , गोविंद पाटील कपाळे सर ,बापुराव पाटील पांडागळे , रमाकांत पांडे यांची उपस्थीती होती.
