Sunday, May 28, 2023
Home महाराष्ट्र मंदिर सरकारीकरणासह मंदिरांच्या अन्य समस्या सोडवण्याविषयी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर स्वतंत्र बैठक लावणार – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री -NNL

मंदिर सरकारीकरणासह मंदिरांच्या अन्य समस्या सोडवण्याविषयी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर स्वतंत्र बैठक लावणार – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री -NNL

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर !

by nandednewslive
0 comment

मुंबई। महाराष्ट्रातील मंदिरांच्या समस्यांविषयी सरकार गंभीर आहेअर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्व मंदिरांच्या समस्या सोडवण्याविषयी अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यानंतर संबंधित अधिकारीमंदिर विश्वस्तपुजारी यांची स्वतंत्र बैठक लावण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री श्रीएकनाथ शिंदे यांनी विधानभवनात आयोजित मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत दिलेमंदिरांच्या समस्या सोडवण्याविषयी मुख्यमंत्र्यांनी विश्वस्तांची सविस्तर चर्चा करून सकारात्मक प्रतिसाद दिलातसेच मुख्यमंत्र्यांनी मंदिर विश्वस्तांच्या मागण्यांची गंभीरपणे नोंद घेतलीअशी माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक तथा ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र राज्य संघटक श्रीसुनील घनवट यांनी दिली.

४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या दिवशी जळगाव येथे पार पडलेल्या ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त मंदिरांचे संवर्धन आणि संरक्षण यांसाठी विविध ठराव एकमताने संमत करण्यात आले होतेत्या अनुषंगाने ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने झालेले ठराव मुख्यमंत्र्यांना सादर करून त्याची कार्यवाही करण्याची मागणी समस्त मंदिर विश्वस्तांनी या वेळी केली.

तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी देवस्थानपंढरपूर येथील श्री विठ्ठलरुक्मिणी मंदिरशिर्डी येथील श्रीसाईबाबा संस्थानमुंबई येथील श्री सिद्धीविनायक मंदिर आदी सरकारीकरण झालेल्या मंदिरात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू असून त्याची शासनाकडून चौकशी चालू आहेतसेच ज्या ज्या मंदिरांवर प्रशासक वा न्यायाधीश यांची नेमणूक झालेली आहेती सर्व मंदिरे पुन्हा हिंदूंच्या नियंत्रणात देण्यात यावीया संदर्भात स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात यावेअशा विविध मागण्यांचे निवेदन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

निवेदन देणार्‍या मंदिरांच्या शिष्टमंडळामध्ये राज्याचे बंदरे आणि खनीकर्म मंत्री श्रीदादाजी भुसेशिवसेनेचे नाशिक येथील खासदार श्रीहेमंत गोडसेशिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि आमदार श्रीभरतशेठ गोगावले, ‘श्रीक्षेत्र भीमाशंकर संस्थान’चे अध्यक्ष अधिवक्ता सुरेश कौदरेसहकार्यकारी विश्वस्त श्रीमधुकर गवांदे, ‘श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष श्रीजितेंद्र बिडवईनाशिक येथील ‘श्री काळाराम मंदिरा’चे आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदास महाराज, ‘जी.एस्.बीटेम्पल ट्रस्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीऋत्विक औरंगाबादकरअमळनेर येथील ‘श्रीमंगळग्रह सेवा संस्थान’चे अध्यक्ष श्रीदिगंबर महाले, ‘वडज देवस्थान’चे श्रीआदिनाथ चव्हाणनगर येथील ‘श्री भवानीमाता मंदिर’चे अधिवक्ता अभिषेक भगत, ‘श्री तुळजाभवानी पुजारी मंडळा’चे माजी अध्यक्ष श्रीकिशोर गंगणे, ‘पनवेल जैन संघा’चे अध्यक्ष श्रीमोतिलाल जैनश्रीअशोक कुमार खंडेलवाल, ‘सनातन संस्थे’चे धर्मप्रचारक श्रीअभय वर्तक, ‘धर्मवीर आध्यात्मिक सेने’चे प्रदेशाध्यक्ष ह..अक्षय महाराज भोसले, ‘वारकरी संप्रदाया’चे ह..भगवान महाराज कोकरेमाजी मंत्री श्रीपरिणय फुकेजळगाव येथील भाजपचे आमदार श्रीसुरेश भोळेनागपूर येथील भाजपचे आमदार श्रीविकास कुंभारेगंगापूर येथील भाजपचे आमदार श्रीप्रशांत बंबविधान परिषदेचे भाजपचे आमदार श्रीगोपीचंद पडळकरशहादा येथील भाजपचे आमदार श्रीराजेश पाडवीशिवसेनेचे आमदार श्रीकिशोरआप्पा पाटीलमाजी आमदार श्रीबाळासाहेब मुरकुटेमाजी आमदार श्रीराज पुरोहितठाणेच्या महापौर सौमिनाक्षी शिंदे आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक तथा ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र राज्य संघटक श्रीसुनील घनवट हे उपस्थित होते.

राज्यातील मंदिरांवर प्रशासक आणि न्यायाधीश यांची नियुक्ती करू नये ! – आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदासजी महाराज

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतांना आचार्य महामंडलेश्वर श्रीमहंत सुधीरदासजी महाराज म्हणाले, ‘‘मंदिरावर प्रशासक आणि न्यायाधीश यांची नियुक्ती करू नयेपुजारी आणि विश्वस्त यांच्यामधील जे विषय आहेतते सोडवण्यासाठी उत्तरप्रदेशच्या धर्तीवरील कार्यपद्धत महाराष्ट्रात वापरावीतसेच उत्तरप्रदेश सरकारने वेतनावर पुजारी ठेवले आहेत तशीच पद्धत महाराष्ट्रातही चालू करावी अशी आमची मागणी आहे.’’

मंदिर विश्वस्तांकडून विविध मागण्यांचे ठराव मुख्यमंत्र्यांना सादर !

या वेळी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’कडून मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलेल्या ९ ठरावांमध्ये पुढील मागण्या करण्यात आल्या आहेतमहाराष्ट्र सरकारने सरकारीकरण झालेली मंदिरे मुक्त करून न्यायालयाच्या आदेशांचे पालन करावेराज्य सरकारने मंदिरांची संपत्ती विकास कामांसाठी न वापरण्याची घोषणा करावीपौराणिक किंवा ऐतिहासिक महत्त्व असलेल्यापरंतु प्रशासनपुरातत्त्व विभाग यांकडून दुर्लक्षित मंदिरांचा तात्काळ जीर्णाेद्धार करण्यासाठी भरीव तरतूद करावीराज्यातील तीर्थक्षेत्रे आणि गडकिल्ले असलेल्या मंदिरांवरील अतिक्रमण यांचे सर्वेक्षण करून ती तात्काळ हटवावीतमंदिरांच्या पुजारीवर्गाचे उत्पन्न नगण्य असल्याने सरकारने त्यांना प्रतिमाह मानधन द्यावेमंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांच्या पावित्र्यरक्षणार्थ त्यांच्या परिसरात मद्यमांस यांची विक्री करता येणार नाहीअशी शासनाने अधिसूचना काढावीराज्यातील ‘क’ वर्गातील योग्य कागदपत्रे उपलब्ध असलेल्या मंदिरांना त्वरित ‘ब’ वर्गात वर्गीकृत करावेमंदिरांना सामाजिक कारणांसाठी देणगी देण्यासाठी धर्मादाय आयुक्तांकडून आज्ञापत्रे पाठवली जाऊ नयेततसेच मंदिरांचा निधी प्राधान्याने धार्मिक कार्यासाठीच उपयोगात आणावालेण्याद्री येथील अष्टविनायक मंदिरांपैकी श्री लेण्याद्री गणपति मंदिर या ठिकाणी जातांना जो केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून तिकीट आकारले जाते ते तात्काळ रहित करण्यासाठी आदेश काढावेत.

श्री. सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ,
राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड,
हिंदु जनजागृती समिती (संपर्क : 7020383264)

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!